खळबळजनक! कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह  गजानन भोयर
महाराष्ट्र

खळबळजनक! कुजलेल्या अवस्थेत आढळले दोन मृतदेह

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली शेत शिवारात काल सायंकाळच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत २ मृतदेह आढळल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, काल भुली या ठिकाणी शेतकऱ्यांना नाल्याच्या काठावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पडून असल्याचे दिसून आले आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर त्यांनी याची माहिती मानोरा पोलिसांना दिली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला आहे. मागील दहा दिवसांत मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही मृतदेहाची ओळख पटली असून,अशोक राठोड (वय- 57) तर काशीराम आडे (वय- 60) दोघेही वाईगौळ ता मानोरा येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र, मृत्यू नेमके कसे झाले आहे. याचा तपास मानोरा पोलीस करत आहेत. मृतक दोन्ही व्यक्तींचे शवविच्छेदन करणे खूप गरजेचे होते. त्याकरिता मानोरा या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यात आला. मात्र, वृत्त लिहिस्तोवर ३ तास आरोग्य विभागाकडून कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेला नव्हता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT