Nandurbar: 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथी वर्ग सुरू होणार
Nandurbar: 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथी वर्ग सुरू होणार दिनू गावित
महाराष्ट्र

Nandurbar: 1 डिसेंबर पासून पहिली ते चौथी वर्ग सुरू होणार

दिनू गावित

नंदुरबार - जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात एकूण १ हजार ७३६ पहिली ते चौथी शाळा असून, तब्बल १ लाख २९ हजार ६३५ चिमुकल्यांची शाळेची घंटा उद्यापासून वाजणार असल्याची प्राथमिक माहिती शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्व संबंधित घटकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये एक दिवसा आडचा पॅटर्न कायम राहणार आहे.

हे देखील पहा -

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व शाळांनी त्यादृष्टीने तयारीला वेग दिला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता प्राथमिक शाळांमध्ये सर्वाधिक १३९४ शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पाल्याची प्रकृती खराब असल्यास त्यास शाळेत न पाठविण्याचे आवाहन पालकांना करण्यात येत आहे.

जिल्ह्यात याआधीच आठवी ते १२ वी च्या व त्यानंतर पाचवी ते सातवीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात एसटी बससेवा बंद असल्यामुळे सध्या काही प्रमाणात उपस्थितीबाबत अडचणी येत आहेत. आता पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होणार असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. उद्या पहिली ते चौथी वर्गातील शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाद्वारे स्वागत करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राहुल चौधरी यांनी सांगितले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK vs RR, IPL 2024: राजस्थानकडून रियान पराग एकटाच लढला! CSK ला जिंकण्यासाठी १४२ धावांची गरज

Nashik News : टोल कर्मचाऱ्यांनी केली अरेरावी; संतप्त नागरिकांनी मालेगाव -कुसुंबा रोडवरील फोडला टोलनाका

Mumbai North Lok Sabha: कोण होणार उत्तर मुंबईचा खासदार? पियुष गोयल भाजपाचा गड राखणार?

Nandurbar Lok Sabha : मोबाईल आणल्यास थेट कारवाई; मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात बंदी

Black Raisins Benefits: काळे मनुका खाण्याचे फायदे?

SCROLL FOR NEXT