Kalyan Crime News, Sameer Lokhande  SAAM TV
महाराष्ट्र

Kalyan Crime News : १० ते १२ जणांची टोळी तुटून पडली; १७ वर्षीय मुलाचा घेतला जीव, कल्याण हादरले

17 year old boy killed in Kalyan : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच, एका १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अभिजीत देशमुख, कल्याण

17 year old boy killed in Kalyan : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीच्या हत्येची घटना ताजी असतानाच, एका १७ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

समीर लोखंडे (वय १७) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरात ही घटना घडली. १० ते १२ जणांच्या टोळक्यानं या मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाला. कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत, काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

किरकोळ कारणावरून घेतला जीव

कल्याण पूर्वेकडे काल, शुक्रवारी दहा ते बारा जणांच्या टोळक्यानं १७ वर्षीय मुलाला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. क्षुल्लक कारणावरून टोळक्यानं या मुलाचा जीव घेतला, असे सांगण्यात येत आहे. हत्या करणाऱ्या काही संशयित आरोपींना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, वृत्त हाती येईपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कल्याणमध्ये चाललंय काय?

कल्याणमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये भररस्त्यात एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. तरुणावर कोयत्याने हल्ल्याची घटनाही घडली होती. दोनच दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे कल्याण आणि परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली. उपाययोजना सुरू केल्या आहेत. तरीही गुन्हेगारी थांबताना दिसत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT