Parbhani News Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani News: येलदरी धरणात बुडून 16 वर्षीय मुलाचा मृत्यू; 2 दिवसांनी सापडला मृतदेह

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राजेश काटकर

Parbhani News: जिंतूर शहरातील नामदेव नगर येथील कल्याणकर परिवार हे येलदरी येथे फिरण्यासाठी गेले असता सेनगाव हद्दीतील येलदरी जलशयात वडील व मुलगा पोहण्यासाठी उतरले होते पण पोहता पोहता 16 वर्षीय मुलगा पाण्यात बुडल्याची घटना दोन दिवसांपूर्वी दुपारी दीडच्या सुमारास ही घडली होती. (Latest Marathi News)

जिंतूर शहरातील एकलव्य शाळा परिसरातील नामदेव नगर भागातील रहिवासी संजय कल्याणकर हे आपल्या कुटुंबा सोबत सेनगाव हद्दीतील येलदरी रस्त्यावरील वन विभागाच्या उद्यानात फिरण्यासाठी गेले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर (Jintur) शहरातील एकलव्य शाळा परिसरातील नामदेव नगर भागातील रहिवासी संजय कल्याणकर हे आपल्या कुटुंबासोबत सेनगाव हद्दीतील येलदरी रस्त्यावरील वन विभागाच्या उद्यानात फिरण्यासाठी गेले होते.

उन्हाचा पारा चढल्याने गार्डनच्या बाजूला असलेल्या येलदरी जलशयात वडील संजय कल्याणकर व मुलगा रोहन कल्याणकर (वय 16 वर्ष) हे दोघं पाण्यात पोहत होते. यावेळी मुलगा खोल पाण्यात गेल्याने तो जलयशयाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाला. (Parabhani News)

सदर माहिती जिंतूर व सेनगाव पोलिसांना (Police) देताच पोलीस प्रशासन,व इतर प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन दिवस प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने बेपत्ता मुलाचा शोध घेण्याचे कार्य सुरूच होते. अखेर काल सायंकाळी या मुलांचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Ganeshotsav Bus : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, गणेशभक्तांच्या बसचा आधी टायर फुटला; नंतर पेट घेतला, क्षणात...

Xiaomi Redmi Note 15 Pro लाँच, प्रीमियम कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Budh Gochar 2025: गणेश चतुर्थीपासून चमकणार 'या' २ राशींचं नशीब; बुध ग्रहाच्या गोचरमुळे बसणार धन

Shatataraka Nakshatra : कुंभ राशीचे रहस्य; शततारका नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

SCROLL FOR NEXT