लातूर हादरलं! 15 वर्षाय मुलीवर बलात्कार तर 11 वर्षीय मुलावर अत्याचार  Saam Tv
महाराष्ट्र

लातूर हादरलं! 15 वर्षाय मुलीवर बलात्कार तर 11 वर्षीय मुलावर अत्याचार

औसा तालुक्यातील एका गावात 31 वर्षीय तरुणाने स्वतःच्या घर शेजारी राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला.

दिपक क्षीरसागर

लातूर: औसा तालुक्यातील एका गावात 31 वर्षीय तरुणाने स्वतःच्या घर शेजारी राहणारी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला बोलावून जबरदस्तीने बलात्कार केला. सदरची पीडित मुलगी 3 महिन्यांची गरोदर राहिली असून तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून गर्भपात करण्यात आला आहे. आवश्यक नमुने रासायनिक तपासणीसाठी नांदेड येथील प्रयोगशाळेत पाठवले असून महिला तक्रार निवारण केंद्रातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपाली गीते यांच्या फिर्यादीवरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करीत आहेत.

त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील औसा शहरात राहणाऱ्या11 वर्षीय मुलावर त्याच्याच चुलत भाऊ 22 वर्षीय तरुणाने घरात बोलावून घेऊन भीती दाखवून लैंगिक दुष्कृत्य केले. सदरील घटना 11 वर्षीय पीडित बालकाने आई आणि मामा यांना सांगितले त्यांनी औसा पोलिसांना सदरील घटना कळवली आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र पीडित बालकांच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याने महिला पोलीस उपनिरीक्षक निलम घोरपडे यांच्या फिर्यादी वरून औसा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब डोंगरे करीत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT