135 kg sweets seized by food and drugs department in trimbakeshwar  Saam Digital
महाराष्ट्र

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये १३५ किलो भेसळयुक्त मिठाई जप्त, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई (Video)

धार्मिक स्थळाच्या यात्रेच्या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन अधिकारी सतर्क असून भेसळयुक्त मिठाईची विक्री केली जाते का याची तपासणी करीत आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने मिठाई विक्रेत्यांवर माेठी कारवाई केली आहे. या कारवाईत अन्न आणि औषध प्रशासनाने तब्बल १३५ किलो भेसळयुक्त जप्त केलेल्या मिठाईचा साठा नष्ट केला. (Maharashtra News)

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पेढा आणि स्पेशल मलई बर्फी विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. भेसळीच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात १३५ किलो भेसळयुक्त मिठाई आढळल्यानंतर संबंधित माल जप्त करण्यात आला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मंदिर परिसरातील दुकानं आणि विक्रेत्यांवर एकाच वेळी अधिकाऱ्यांचा छापा पडल्याने विक्रेत्यांची तारांबळ उडाली. पेढा आणि स्पेशल मलई बर्फीच्या नावाखाली भेसळयुक्त मिठाईची विक्री केली जात असल्याचं या निमित्त आता उघड झाले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने भाविकांना धार्मिक स्थळी प्रसाद म्हणून पेढे, बर्फी, मिठाई आदी खरेदी करतांना ते दुधापासून बनविले असले बाबत खात्री करावी असे आवाहन केले आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात, तक्रार तसेच काही गोपनिय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरीत टोल फ्रि क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT