Makar Santkranti 2023, Nagpur, Nashik, Nagar, Kite Flying saam tv news
महाराष्ट्र

Makar Sankranti 2023 : मांजा पकडण्यासाठी धावणारा चिमुरडा रेल्वेखाली चिरडला; नागपूरसह नगर, नाशकात दुर्घटना

मकर संक्रांत सण साजरा करण्यासाठी राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.

साम न्यूज नेटवर्क

- मंगेश माेहिते, सचिन बनसाेडे, अजय साेनवणे

Makar Sankranti 2023 Marathi News : मकर संक्रात निमित्त राज्यात लहान मुलांसह युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिकांनी पतंग उडविण्याचा (kite flying) आनंद लुटण्यास प्रारंभ केला आहे. या सणाचा राज्यभरात उत्साह असला तरी काही ठिकाणी त्याला गालबाेट लागल्याचे चित्र आहे. नाशिक (nashik) , नगर (nagar) जिल्ह्यात नायलाॅन मांजामुळे नागरिक जखमी (injured) झाले आहेत. तर नागपूरात मांजा पकडण्यासाठी धावणा-या एका लहान मुलाचा रेल्वे ट्रकवर अपघाती मृत्यू झाला. (Maharashtra News)

रेल्वेने 'वंश'ला चिरडलं

नागपूरातील कुंभार टोळी परिसरात वंश दुर्वे या तेरा वर्षाखालील मुलाचा पतंगीच्या नादात जीव गेला. वंश हा काल दुपारच्या वेळेस पतंग खेळायला गेला हाेता. ताे एक कटलेल्या पतंगीचा मांजा पकडण्यासाठी धावत हाेता. धावत धावत ताे रेल्वे ट्रकवर पाेहचला. ट्रकवर त्याचा पाय अडकला. त्याच वेळी यशवंतपूर एक्सप्रेस आली आणि त्याला चिरडलं.

कोपरगावात पाेलिसांच्या कारवाईची गरज

कोपरगाव शहरात मोटारसायकलवरुन निघालेल्या एका नागरिकाचा नायलाॅन मांजामुळे गळा चिरला गेला. सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. नायलॉन मांज्यावर बंदी असूनही अनेक दुकानदार चोरून नायलॉन मांजाची विक्री करत आहेत हे आजच्या घटनेवरुन समाेर आले आहे. पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा तपासणी करुन नायलाॅन मांजा विक्री करणा-या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून (citizens) होत आहे.

येवल्यात पतंगाेत्सवला गालबाेट

येवला शहरात आज पासून तीन दिवस पतंगोत्सवाला सुरूवात झाली. आज पहिल्याच दिवशी त्याला गालबोट लागले. दुचाकीवरून जात असताना बाबासाहेब थळकर यांच्या गळ्याभाेवती नायलॉन मांजाने कापल्याने ते गंभीर जखमी झाले.

त्यांच्या मानेला दहा टाके पडले आहेत तसेच हाताला पंचवीस टाके पडल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. बाबासाहेब थळकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात (hospital) उपचार सुरू आहेत. नायलॉन मांजावर प्रशासनाने बंदी घातली असून देखील त्याचा सरार्स वापर होत असल्याचे या घटनेमुळे पुढे आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: चांदिवली विधानसभेत शिंदे गटाला धक्का; नसीम खान आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

SCROLL FOR NEXT