देशात सहा महिन्यात 86 वाघांचा मृत्यु; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर Saam Tv
महाराष्ट्र

वर्षभरात देशात 126 वाघांचा मृत्यू!

२०२१ या सरत्या वर्षात देशभरात एकूण १२६ वाघांचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूची ही संख्या गेल्या एका दशकातील सर्वाधिक आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : २०२१ या सरत्या वर्षात देशभरात एकूण १२६ वाघांचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूची ही संख्या गेल्या एका दशकातील सर्वाधिक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) कडून या वर्षी २९ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली.  यात १२६ मोठ्या वाघांपैकी ६० वाघ हे शिकार, अपघात आणि संरक्षित क्षेत्राबाहेर मानव-प्राणी संघर्षाला बळी पडले आहेत.

हे देखील पहा :

२०१८ च्या गणनेनुसार, भारतात २,९६७ वाघ होते. एनटीसीएने २०१२ पासून सार्वजनिकरीत्या वाघांच्या मृत्यूची नोंद ठेवली आहे. यावर्षी वाघांच्या मृत्यूची संख्या दशकातील सर्वाधिक असू शकते, अशी शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. याचे कारण म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल ९९ वाघांचे मृत्यू झाले होते.

यापूर्वी २०१६ मध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तेव्हा ती संख्या १२१ वर होती. महाराष्ट्रात या काळात २६ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या २६ वाघांपैकी सर्वाधिक १५ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झालाय तर विषबाधा, शिकार, रेल्वे अपघात, वीज प्रवाहाचा स्पर्श ही कारणे देखील यात समाविष्ट आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू

Delhi Blast: स्फोट घडवण्यासाठी दोन कारचा वापर? i20 नंतर EcoSport कारचा शोध सुरू

कर्णबधिर असल्याचे भासवून थेट तहसीलदाराची नोकरी मिळवली? प्रशासकीय वर्तुळात खळबळ| VIDEO

Maharashtra Politics: बीडमध्ये मोठा राजकीय भूकंप, ४ वेळा आमदार आणि मंत्री राहिलेला नेता अजित पवार गटाच्या वाटेवर

GenZ Search Trends: १८ वर्षांचे तरुण गुगलवर काय सगळ्यात जास्त सर्च करतात? उत्तर जाणून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT