महाराष्ट्र

बारावीत कमी गुण मिळाल्याने बार्शीत विद्यार्थिनीची आत्महत्या

८५ ते ९० टक्के मार्कांची अपेक्षा असणाऱ्या सृष्टीला ६५% मिळाल्याने नैराश्यतून तिने हे टोकाचं पाऊल उचललं.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने बार्शीत एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सृष्टी बोंदर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती मुळची उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवधानोरा गावची रहिवासी आहे.

सृष्टी बारावीच शिक्षण घेण्यासाठी बार्शीतील (Barshi) ब्रम्हचैतन्य नगरमध्ये भाड्याची खोली घेऊन राहत होती. राज्य मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल अवघ्या दोन्ही दिवसांपूर्वीच म्हणजे बुधवारी ८ जून रोजी जाहीर झाला.

हे देखील पाहा -

मात्र, बारावीमध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने सृष्टीने भाड्याच्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. ८५ ते ९० % ची अपेक्षा असणाऱ्या सृष्टीला ६५% मिळाल्याने नैराश्यतून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. तिच्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वातर हळहळ व्यक्त केली जातं आहे. दरम्यान, सृष्टीच्या आत्महत्येबाबतचा पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vitamins: जास्त व्हिटॅमिन्सही बरं नव्हं! अति सेवनाने आरोग्यावर होतो दुष्परिणाम

Election Commission: राहुल गांधींच्या आरोपानंतर निवडणूक आयोग घेणार मोठा निर्णय; याद्यांतील घोळ,मतचोरीविरोधात उचलणार कठोर पाऊल

लाखांचं सोनं 100 रुपयांवर येणार? सोन्याची किंमत का घसरणार?

अॅग्रीमेंट रिलेशनशीप, लव्ह जिहादचा नवा ट्रेंड? मुलींना फसवण्यासाठी नवं जाळं?

RCB Player: १५ वर्षांच वनडे करिअर संपलं, ढसाढसा रडत सोडलं मैदान, आरसीबीतील महत्त्वाच्या खेळाडूची निवृत्ती

SCROLL FOR NEXT