Sharad pawar Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शरद पवारांचा कोल्हापुरात मुक्काम, विरोधकांना घाम; 'हे' 12 बडे नेते वाजवणार तुतारी? वाचा...

Sharad Pawar Kolhapur Visit: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येतायेत.

Mayuresh Kadav

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांचा सुरूवातीपासूनच दबदबा राहिलाय. मात्र राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर पवारांनी कोल्हापूरचा गड कायम राखण्यासाठी कंबर कसलीय. पवारांच्या कोल्हापूर दौऱ्याचा विरोधकांची चांगलाच धसका घेतलाय. कारण या दौऱ्यात महायुतीचे बडे नेते पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपचे समरजीत घाटगे तुतारी फुंकणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समरजित घाटगे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार आहेत.

चंदगड विधानसभा मतदारसंघात राजेश पाटील यांच्या विरोधात कोण मातब्बर असणार? याची चर्चा आणि प्लॅनिंग होणार आहे. शिवाय राधानगरी विधानसभा मतदारसंघात कुणाला संधी मिळेल याचीही रणनीती ठरेल. आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी किती जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाणार? हा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय.

दरम्यान, राजकारणात शरद पवार कधी काय करतील याचा नेम नाही. विरोधकांना गाफील ठेऊन धोबीपछाड देण्यात पवार माहिर आहेत. आता कोल्हापूरच्या आखाड्यात पवार नेमका कोणता डाव टाकतात हेच पाहायचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षाच्या काळात 'हे' पदार्थ खाऊ नयेत

Pune : मावळात राजकीय भूकंप, अजित पवारांना जोरदार धक्का, बापू भेगडेंसह शेकडो कार्यकर्तांचा राष्ट्रवादीला रामराम

OMG! एक, दोन नाही...तर मातेच्या कुशीत चक्क 7 बाळं, आधी तिळे आता एकाचवेळी ४ मुलांना जन्म

Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पाऊस; वसमतमध्ये अनेक गावात शिरले पुराचे पाणी, बेरोळा गावकऱ्यांचा संपर्क तुटला

पुण्यात फक्त ₹७ लाखांत घर, म्हाडाची बंपर लॉटरी; हक्काच्या घरासाठी आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT