11th Admission Saam Tv News
महाराष्ट्र

11th Admission: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर

11th Admission Process: अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया लांबणीवर गेली आहे.

Siddhi Hande

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांच्या कॉलेजचे वे अलाइनमेंट 26 जूनला प्रसिद्ध होणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्यावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (11th Admission Process)

राज्यातील जुनिअर कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येणारे अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर पडली. अलाइनमेंट यादीत नाव प्रसिद्ध होणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 जून ते तीन जुलै या कालावधीत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी पाच जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत नोंदणी केलेल्या बारा लाख विद्यार्थ्यांना प्रवेशांचा आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक

अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरीवाटप 12 ते 14 जून

प्रवेश फेरी १चे वाटप करणे 26 जून

कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 27 जून ते 3 जुलै

प्रवेश फेरी दोन साठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करणे पाच जुलै

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होऊन खूप दिवस झाले आहेत. सुरुवातीला तांत्रिक अडचणींमुळे वेबसाइट बंद झाली होती. त्यानंतर २-३ दिवस वेबसाइट बंद होती. यानंतर पुन्हा अकरावीच्या प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले. यानंतर आता विद्यार्थ्यांच्या कॉलेजचे वे अलाइनमेंट 26 जूनला जाहीर होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अजून लांबणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT