11th Admission List Saam Tv
महाराष्ट्र

11th Admission List: अकरावी प्रवेश प्रकियेची पहिली यादी आज होणार जाहीर; अशा पद्धतीने करा चेक

11th Admission List Releasing Today: अकरावी प्रवेश प्रकियेची पहिली यादी आज जाहीर होणार आहे.या यादीत विद्यार्थ्यांचा कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे हे कळणार आहे.

Siddhi Hande

दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यापासून विद्यार्थ्यांनी अकरावीच्या कॉलेज प्रवेशाची तयारी सुरु केली होती. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रकियेसाठी अर्ज केले होते. त्यानंतर आता २७ जून रोजी अकरावी प्रवेश प्रकियेची पहिली यादी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यांना २७ जून ते १ जुलैपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित करायचा आहे. या यादीत विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास त्यांना प्रवेश घेणे बंधनकाराक आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केले जात आहेत. यासाठी आज यादी जाहीर होणार आहे.विद्यार्थ्यांना स्वतः च्या लॉग इनमध्ये जाऊन कोणते कॉलेज मिळाले आहे, हे चेक करता येईल. त्यानुसार पुढील अॅडमिशन प्रक्रिया करावी लागेल. यानुसार जर तुम्हाला कॉलेज मिळाले तर त्यांना महाविद्यालयाच्या वेबसाइटवर जाऊन प्रोसिड फॉर अॅडमिशन या पर्यायावर क्लिक करुन सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. यानंतर संबंधित महाविद्यालयात जाऊन आपले अॅडमिशन निश्चि करावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांना यादीतील पहिले कॉलेज लागले असेल त्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर तुम्ही या महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही तर त्यांना पुढील फेरीसाठी फॉर्म भरता येणार नाही.

जर तुम्हाला तुमच्या पहिला क्रमांक सोडून इतर कॉलेजपैकी एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करु शकतता. यासाठी तुम्हाला http://11thadmission.org.in/ या वेबसाइटवर जाऊन पुढील प्रोसेस करावी लागेल.

पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरी लवकरच जाहीर करण्यात येईल. जवळपास ४-५ फेऱ्या घेण्यात येतात. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळते. सर्व प्रवेश फेऱ्या झाल्यानंतरच अकरावीचे कॉलेज सुरु होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT