ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योग केल्यामुळे आपले शरीर निरोगी आणि तंदुरुस्त रहाते. मात्र, कोरोना काळात ऑनलाईन योग शिकण्याचे प्रमाण वाढले आहे.
सध्या ऑनलाईन योग शिकण्याचा ट्रेंड भारतासह आमेरीका, दुबई, जर्मनी, युनायटेड किंगडम या देशांमध्ये देखील पहायला मिळतोय.
यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबूक या सारख्या अॅप्समुळे ऑनलाईन योग अगदी सोपे झाले आहे. मात्र, ऑनलाईन योग शिकण्यचे फायदे जाणून घ्या.
योग नियमित सराव केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ज्यालोकांना रात्री झोप लागत नाही त्यांनी नियमित योगचा सराव करावा यामुळे त्याच्या झोपेचे चक्र सुधारते.
दररोज योग केल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर निरोगी रहाते.
योग केल्यामुळे मेंदूची नियमित वाढ होते आणि मनात सकारात्मकता वाढण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.