परळीत सुरू असलेल्या बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणानाचा 10 वा दिवस SaamTv
महाराष्ट्र

परळीत सुरू असलेल्या बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणानाचा 10 वा दिवस

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी दुसऱ्यांदा दिली उपोषणकर्त्यांना भेट...

विनोद जिरे

बीड : बार्टीच्या माध्यमातून देण्यात येणारी फेलोशिप, एम फिलच्या 2 वर्षासह पीएचडीच्या 3 वर्षासाठी देखील देण्यात यावी. ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या 10 दिवसांपासून, बीडच्या (Beed) परळीत (parli) बार्टीच्या विद्यार्थ्यांचे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या 3 ऱ्या दिवशी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी या विद्यार्थ्यांची धावती भेट घेतली होती आणि या अधुऱ्या भेटीने, विद्यार्थ्यांनी आपली नाराजी माध्यमांशी बोलतांना सांगितली होती.

हे देखील पहा :

मात्र, आज उपोषणाच्या 10 व्या दिवशी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी, खास वेळ काढत या बसलेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे व मागण्यांवर सविस्तर चर्चा केलीय.धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यास (Students) सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितल्याने, विद्यार्थ्यांनी तूर्तास 6 जानेवारी पर्यंत हे साखळी उपोषण मागे घेतले आहे.

मात्र, 6 तारखे पर्यंत मागण्या मान्य झाल्या तर हे उपोषण रद्द होईल, अन्यथा पुन्हा 7 तारखेला अधिक तीव्र स्वरूपाचे साखळी उपोषण करू. असा इशारा उपोषन कर्त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे. दरम्यान बार्टीतील (BARTI) 194 विद्यार्थ्यांचे भवितव्य, हे 6 जानेवारीच्या बैठकीवर अवलंबून असून त्यामुळं कोणता निर्णय होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Politics: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का, बड्या महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Maharashtra Live News Update : मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकारणात पडद्यामागं मोठी घडामोड|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT