Maharashtra 10th, 12th Exams saam tv
महाराष्ट्र

10th and 12th Exam: 10वी, 12वी परीक्षेचा पॅटर्न बदलणार? 'एससीईआरटी'कडून नवा आराखडा; जाणून घ्या सविस्तर माहिती

Education news: राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एससीईआरटीने आता विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी यासाठी पुढाकार घेतलाय.

Girish Nikam

दहावी, बारावीची परीक्षा पद्धत आणि निकालावरुन नेहमीच बोट ठेवलं जातं. शिक्षण तज्ञांमध्येही मतमतांतरे आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एससीईआरटीने आता विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी यासाठी पुढाकार घेतलाय.

तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे. तो आराखडा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून त्यावर हरकती मागविल्या होत्या. आता तो आराखडा अंतिम करण्यात आलाय. त्यात क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला आहे. महत्वाचे काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊ...

कसा असेल नवीन आराखडा?

  • तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा पाठ्यक्रम

  • मानवी मूल्ये, जीवन कौशल्ये, नैतिकतेवर आधारित शिक्षण

  • पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतीतून ज्ञाननिर्मिती करण्याचा उद्देश

  • तिसरी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा दोन सत्रात होणार

  • परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर देण्यात येणार

  • आगामी दहावी-बारावीची परीक्षा 10 दिवस आधी होणार

नवीन आराखड्यात आरोग्य, कला आणि व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आलाय. व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असे नावीन्यपूर्ण विषय असतील. आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा दहावी-बारावीसाठी लागू करण्याचं नियोजन आहे.

दहावी-बारावीची परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याचं नियोजित आहे. त्यावरील हरकती, सूचना पाहून बोर्डाकडून काही दिवसात अंतिम वेळापत्रक जाहीर केलं जाईल. हा नवीन पॅटर्न विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीला पूरक ठरणार का हे येत्या काळात कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT