mla anil babar, mla shambhuraj desai saam tv
महाराष्ट्र

Koyna Dam Water : आमदारांची शिष्टाई, मंत्र्यांचा हाेकार, आजच्या आज काेयनेच्या पाणी सांगलीकरांना मिळणार

या निर्णयामुळे शेतक-यांना माेठा दिलासा मिळणार आहे.

Siddharth Latkar

- विजय पाटील

Satara News : कोयना पाणलोट क्षेत्रातुन कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सांगली जिल्ह्यातून सातत्याने हाेऊ लागली आहे. या मागणीचा विचार करुन आज (शुक्रवार) दुपारी एक वाजता काेयना धरणातून काेयना नदीपात्रात पाणी साेडण्याचा निर्णय झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

मौजे डिग्रज येथे आज (शुक्रवार) ग्रामस्थांनी काेयनेच्या पाण्यासाठी नदी पात्रात उतरुन आंदाेलन केले. यावेळी ग्रामस्थांनी काेयना धरणातून पाणी न साेडल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला हाेता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी आल्यामुळे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे एक युनिट आज (शुक्रवार, ता. 27 ऑक्टोबर) दुपारी एक वाजता सुरू करण्यात येणार असल्याचे काेयना धरण व्यवस्थापानाने कळविले आहे. त्यानूसार कोयना नदीपात्रामध्ये 1050 क्युसेक विसर्ग करण्यात येणार असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटाचे आमदार अनिल बाबर (mla anil babar) यांनी कृष्णा नदीतील कोरड्या पडलेल्या परिस्थितीची दूरध्वनीवरुन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाईंना (mla shambhuraj desai) माहिती दिली. दाेन्ही लाेकप्रतिनिधींच्या चर्चेनंतर मंत्री देसाईंनी काेयनेतून (koyna dam) पाणी देण्यात येईल असे आमदार बाबर यांना आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

IND vs SA 4th T20I: संजू सॅमसनला डच्चू मिळणार? निर्णायक सामन्यासाठी कशी असेल भारताची प्लेइंग XI

VIDEO : शिवाजी पार्कवर मनसेच्या सभेला परवानगी; राज ठाकरे काय भूमिका घेणार?

Beed News : क्षीरसागरांचा ४० वर्षाचा दबदबा मिटवायचाय; आशुतोष मेटेंचे क्षीरसागरावर टीकास्त्र   

SCROLL FOR NEXT