SSC And HSC Exam Saam Tv
महाराष्ट्र

SSC And HSC Exam: १०वी, १२वीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर; तारीख आणि वेळ पाहा

SSC And HSC Exam Timetable: दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Siddhi Hande

१०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. (SSC And HSC Exam Timetable)

दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या काळात होणार आहे. तर बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या काळात होणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक २१ तारखेला म्हणजे आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाकडून संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले आहे. (10th And 12th Exam Timetable)

परिक्षेला उरले फक्त ३ महिने...

दहावी-बारावीच्या परिक्षेला अवघे ३ महिने उरले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता परिक्षेच्या तयारीला लागायला हवे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा ही जानेवारी महिन्यात होणार आहे. तर दहावीचा प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे दोन महिने शिल्लक आहेत. विद्यार्थ्यांनी तयारीला लागायला हवे.(SSC And HSC Exam Result)

दहावी-बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असते. दहावीचे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेणार असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करायला हवा. या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी फार पूर्वीपासूनच तयारी करतात. परंतु शेवटचे ३ महिने हे खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या तीन महिन्यात प्रत्येक विषयाचा सराव करायला हवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT