Vinod Tawde prediction 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election Prediction: महायुतीला किती जागा मिळतील? विनोद तावडेंनी मांडले आकडे

Vinod Tawde prediction: विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महायुतीतील घटक पक्ष किती जागा जिंकणार, यासंदर्भात विनोद तावडे यांनी एक अंदाज मांडला.

Bharat Jadhav

विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा धुराळा उडालाय. प्रत्येक पक्षातील स्टार प्रचारक दिवसाला तीन ते चार सभा घेत आहेत. राज्यातील नागरिकांमध्ये दोन्ही आघाड्यासंदर्भात कल दिसत आहे. त्यामुळे सत्ता कोणाची येणार याविषयी ५०-५० शक्यता वर्तवली जातं आहे. दरम्यान कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील याबाबत अंदाज लावले जात आहे. याचदरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी महायुतीला किती जागा मिळतील याचे आकडे मांडले आहेत.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयासंदर्भात भाष्य केले. निकाल कसा लागू शकतो, महायुतील पक्षाला किती जागा मिळू शकतात, याबद्दलही अंदाज देखील त्यांनी व्यक्त केलाय. महायुती आणि महायुतीतील पक्षांना किती जागा मिळतील? असा प्रश्न विनोद तावडे यांना मुलाखतीत विचारण्यात आला.

त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, अजून प्रचाराचे दिवस आहेत. काल ८ नोव्हेंबरपासून मोदी, अमित भाईंचे प्रचार दौरे सुरू झाले आहेत. महायुती १५५ ते १६० जागा जिंकेल. उरलेल्या जागांमध्ये महाविकास आघाडी असेल, अशी स्थिती आहे असा अंदाज विनोद तावडे यांनी उत्तर देताना वर्तवलाय.

भाजपला ९० ते १०० दरम्यान जागा असतील. चांगला स्ट्राईक रेट राखला जाईल. तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष ४० जागा जिंकेल. अजित पवारांना २० ते २५ जागा मिळतील. दरम्यान प्रचारानंतर त्यांच्या जागा वाढू शकतात", असा अंदाज विनोद तावडे यांनी वर्तवलाय. तर महाविकास आघाडीमध्ये कोणाचा स्ट्राईक रेट जास्त राहील असं वाटतं? असा प्रश्नही तावडेंना करण्यात आला. यावर ते म्हणाले, "काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला राहील. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि त्यानंतर उबाठा", असा अंदाज तावडेंनी व्यक्त केला.

महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर मोठं भाष्य केलं. 'राज्यात महायुतीचं सरकार येईल. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर निर्णय घेण्यात येईल', असं अमित शहा यांनी सांगितले. राज्यात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा जाहीर केला. यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रात महायुतीचा सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT