Maharashtra Political News Saam TV
Maharashtra Assembly Elections

Mumbai Politics : महायुतीचं ठरलं! मुंबईत भाजप तब्बल १८ जागांवर निवडणूक लढवणार; शिंदे गटाला किती जागा मिळणार?

Maharashtra Political News : मुंबईत भाजप सर्वाधिक १८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर १५ जागांवर शिवसेना शिंदे गट आणि उर्वरित २ जागा अजित पवार यांना सोडवण्यात येणार आहे.

Satish Daud

मुंबई : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप मुंबईत तब्बल १८ जागांवर उमेदवार देणार आहे. तर शिवसेना शिंदे गटाला १५ जागा मिळणार आहेत. उर्वरित जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोडण्यात येणार आहे. मुंबईत विधानसभेचे एकूण ३६ मतदारसंघ आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील भायखळा, वरळी, शिवडी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, चेंबूर, अणुशक्ती नगर, माहीम, धारावी, भांडुप पश्चिम, विक्रोळी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मालाड पश्चिम, मागठाणे, चांदिवली, कलिना या १७ मतदारसंघात निरीक्षक नेमले होते. त्यामुळे या सर्वच जागांवर शिंदे गट निवडणूक लढवणार अशी चर्चा होती.

मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल शुक्रवारी दिल्लीत महायुतीतील तिन्ही नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत अमित शहा यांनी महाराष्ट्रासह मुंबईतील जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केल्याची माहिती आहे. त्यानुसार, मुंबईत भाजप सर्वाधिक १८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर १५ जागांवर शिवसेना शिंदे गट आणि उर्वरित २ जागा अजित पवार यांना सोडवण्यात येणार आहे.

त्यामुळे मुंबईतील वरळी आणि मालाड ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची कमी शक्यता आहे. या दोन्ही जागांवर भाजप आपले उमेदवार उभे करणार आहे. वरळी हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात असून याठिकाणाहून आदित्य ठाकरे आमदार आहेत. त्यामुळे इथे भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी तगडी फाईट होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा फैसला विधानसभा निवडणुकीनंतरच होणार, असंही बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कालच्या अमित शहा यांच्या दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. अमित शहा यांनी याबाबत 'वेट अँड वॉचची' भूमिका घेतली आहे. निवडणुकीत ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील, त्यांनाच मुख्यमंत्रीपद देण्यात येईल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

Clove Water Benefits: सलग १० दिवस लवंगाचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Thane : भीषण दुर्घटना! ठाण्यात ५ जणांचा बुडून मृत्यू, पोहायला गेले ते परत आलेच नाहीत

Chutney Recipe : पावसाळ्यात चाखा गावाकडच्या चवीची 'ही' आंबट-तिखट चटणी, एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

SCROLL FOR NEXT