MVA Seat Sharing  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : ठाकरे ३ जागी उमेदवार बदलणार, आधी घोषणा मग माघार का?

Uddhav Thackeray Shiv Sena First Candidate List : लोकसभेतील सांगली पॅटर्नमुळे शिवसेनेकडून सावध भूमिका घेतली जातेय का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ जागांची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. पण यामध्ये तीन ते चार नावांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जागावाटपाची चर्चा सुरु असताना ठाकरेंकडून उमेदवाराची यादी जाहीर केल्यामुळे टीका झाली होती. काही ठिकाणी मविआमध्ये बंडखोरीची चर्चाही सुरु झाली होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेंनी जाहीर केलेलया यादीमध्ये तीन ते चार नावांत बदल करण्यता येणार आहे. (MVA Seat Sharing)

ठाकरे गटाने जाहीर केलेल्या 65 उमेदवारांच्या यादीमध्ये काही मोजक्या तीन ते चार उमेदवारांच्या नावात बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाविकास आघाडीमध्ये काही मोजक्या जागांवर तिढा असताना त्या तिढा असलेल्या जागांवर सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली गेल्याने पहिल्या उमेदवार यादीमध्ये जाहीर गेल्या गेल्या तीन ते चार उमेदवारांच्या नावात बदल होणार असल्याचे समजतेय.

जाहीर केलेल्या 65 जागांमध्ये काही नावांमध्ये बदल केले जाणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये यात 65 जागा ज्या शिवसेना ठाकरे गटांनी जाहीर केल्या आहेत. त्यातील मोजक्या तीन ते चार जागांवर काही ठिकाणी काँग्रेसचे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे अग्रही आहेत. त्यामुळे उमेदवारी संदर्भात पुन्हा एकदा पुनर्विचार केला जावा अशी मागणी त्या पक्षाकडून शिवसेना ठाकरे गटाला करण्यात आली. ठाकरेंच्या ज्या तीन ते चार उमेदवारांची नावं बदलली जाणार तिथे महाविकास आघाडीच्या पक्षांतर्गत जागांची अदालाबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

ठाकरेंच्या पहिल्या यादीत कोण कोण?

चाळीसगाव उन्मेश पाटील

पाचोरा वैशाली सुर्यवंशी

मेहकर (अजा) सिध्दार्थ खरात

बाळापूर नितीन देशमुख

अकोला पूर्व गोपाल दातकर

वाशिम (अजा) डॉ. सिध्दार्थ देवळे

बडनेरा सुनील खराटे

रामटेक विशाल बरबटे

वणी संजय देरकर

लोहा एकनाथ पवार

कळमनुरी डॉ. संतोष टारफे

परभणी डॉ. राहुल पाटील

गंगाखेड विशाल कदम

सिल्लोड सुरेश बनकर

कन्नड उदयसिंह राजपुत

संभाजीनगर मध्य किशनचंद तनवाणी

संभाजीनगर प. (अजा) राजु शिंदे

वैजापूर दिनेश परदेशी

नांदगांव गणेश धात्रक

मालेगांव बाह्य अद्वय हिरे

नाशिक मध्य वसंत गीते

नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर

पालघर (अज) जयेंद्र दुबळा

बोईसर (अज) डॉ. विश्वास वळवी

निफाड अनिल कदम

भिवंडी ग्रामीण (अज) महादेव घाटळ

अंबरनाथ (अजा) राजेश वानखेडे

डोंबिवली दिपेश म्हात्रे

कल्याण ग्रामीण सुभाष भोईर

ओवळा माजिवडा नरेश मणेरा

कोपरी पाचपाखाडी केदार दिघे

ठाणे राजन विचारे

ऐरोली एम.के. मढवी

मागाठाणे उदेश पाटेकर

विक्रोळी सुनील राऊत

भांडुप पश्चिम रमेश कोरगावकर

जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर

दिंडोशी सुनील प्रभू

गोरेगांव समीर देसाई

अंधेरी पूर्व ऋतुजा लटके

चेंबूर प्रकाश फातर्पेकर

कुर्ला (अजा) प्रविणा मोरजकर

कलीना संजय पोतनीस

वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई

माहिम महेश सावंत

वरळी आदित्य ठाकरे

कर्जत नितीन सावंत

उरण मनोहर भोईर

महाड स्नेहल जगताप

नेवासा शंकरराव गडाख

गेवराई बदामराव पंडीत

धाराशिव कैलास पाटील

परांडा राहुल ज्ञानेश्वर पाटील

बार्शी दिलीप सोपल

सोलापूर दक्षिण अमर रतिकांत पाटील

सांगोले दिपक आबा साळुंखे

पाटण हर्षद कदम

दापोली संजय कदम

गुहागर भास्कर जाधव

रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) माने

राजापूर राजन साळवी

कुडाळ वैभव नाईक

सावंतवाडी राजन तेली

राधानगरी के. पी. पाटील

शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Burger E-COLI: एक बर्गर करेल तुमचा घात?बर्गरमधील E-COLI जीवाणूमुळे एकाचा बळी

Assembly Election: मविआत शंभरी कोणाची? जागावाटपावरुन मविआत रस्सीखेच

Maharashtra Election: संजय शिरसाट यांना ठाकरेंच्या राजू शिंदेंचं आव्हान; संभाजीनगर पश्चिमचा गड राखणार?

Congress vs BJP Clash : नगरमध्ये विखे-थोरात वाद टोकाला; अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ, VIDEO

Border Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री, तर स्टार खेळाडू बाहेर

SCROLL FOR NEXT