Uddhav Thackeray on Amit Thackeray Uddhav Thackeray on Amit Thackeray
Maharashtra Assembly Elections

Uddhav Thackeray : विषय संपला! 'अमितला पाठिंबा नाही', उद्धव ठाकरेंनी कारणही सांगितलं

Uddhav Thackeray on Amit Thackeray : माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना काकांनी पाठिंबा देण्यास नकार दिलाय. त्याचं कारणही त्यांनी सांगितलेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha Election : अमित राज ठाकरे, माहीम मतदारसंघातून आपलं नशीब अजमावत आहेत. मनसेकडून अमित ठाकरे माहीमच्या रिंगणात उतरल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांना पाठिंबा देणार का? याच्या चर्चा रंगल्या. त्याशिवाय उद्धव ठाकरेंचा अमित ठाकरेंना छुपा पाठिंबा असल्याचे बोललं जाऊ लागले. पण या चर्चेचा विषय उद्धव ठाकरेंनी संपवला आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं. ठाकरेंच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राज ठाकरेंनी या वक्तव्याचा समाचार घेताना २०१९ मधील निवडणुकीत आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिल्याची आठवण करुन दिली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

एका मुलाखतीत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहीममध्ये कुणालाही पाठिंबा नसल्याचं स्पष्ट केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रासोबत माझं रक्ताचं नातं आहे. त्यांना (महायुतीला) स्वप्नातही पाठिंबा देणार नाही, विषय संपला, असं उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत सांगितले. अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. कोरोनामध्ये माझं कुटुंब माझी जबाबदारी घेतली होती. आज ते कुटुंब लुटले जातेय, त्या लुटारूंना अप्रत्यक्षपणे स्वप्नातही पाठिंबा देणार नाही. त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं जाहीर केलेय. म्हणजेच महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावर होईल. स्वप्नातही महाराष्ट्राच्या लुटारुंना पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंचा निशाणा -

महायुती सरकार महाराष्ट्र लुटारु आहे. त्यांना पाठिंबा देणारे आणि मदत करणारेही त्यांना मदत करतात. कधी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी माझ्या आजारपणाचीही खिल्ली यांनी उडवली होती. महाराष्ट्राला लुटणाऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणार नाही. अथवा त्या लोकांना मदत करणाऱ्यांनाही मदत करणार नाही, हे मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन बोलतोय, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेय.

भीक नकोय, तुमची - राज ठाकरे -

राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला. मला तुमची भीक नकोय. मला कधी राजकारणात यायचेही नव्हते. पण २०१९ मध्ये वरळीत आदित्य ठाकरे मैदानात उतरले होते. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच मैदानात उतरल्यामुळे आम्ही पाठिंबा दिला. वरळीमध्ये आमचा हक्काचा ३९ हजार मतदार आहे. आम्हाला कुणाची भीक नकोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT