Supriya Sule on Ajit Pawar Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Supriya Sule : अजित पवारांना फाईल दाखवली कशी? देवेंद्र फडणवीसांवर केस करणार, सुप्रिया सुळेंचा इशारा

Supriya Sule on Devendra Fadnavis : सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. अजित पवारांना फाईल दाखवल्यावरुन सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलाय.

Namdeo Kumbhar

Supriya Sule on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. निवडणूक संपण्याची वाट पाहतेय, त्यानंतर केस करणार असल्याचा इशारा दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केलेय.

७० हजार कोटींच्या घोटाळ्याच्या तपासाच्या फाईलवर सही तुम्ही केली. संविधानावर हात ठेवून शपथ घेतली. ती फाइल तुम्ही घरी कशी मागवली, ज्या अजित पवारांवर तुम्ही आरोप केला, त्यांना फाईल कशी दाखवली? मला याचं उत्तर पाहिजे, राज्याला याचं उत्तर पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला फसवलं आहे. मी निवडणूक संपण्याची वाट पाहतेय, केस करणार, असा सूचक इशारा सुप्रिया सुळे यांनी भरसेभत दिला.

कधीतरी खरं बोला, खोटा बोला अन् रेटून बोला.. घोटाळा झाला की नाही, यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी फाईल दाखवलीच कशी? याचं उत्तर हवेय, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी फाईल का दाखवली, याचं उत्तर दिलं पाहिजे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. त्यांना राज्याला उत्तर द्यावं लागेल. कारण देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे. राज्याचे मुखमंत्री असतो, फाईल्स कोणाला दाखवण्याचा अधिकार नाही. ज्या व्यक्तीवर आपण केस करतो, त्या व्यक्तीला आपण बोलवून फाईल दाखवली. हे योग्य आहे? हा संविधानाचा अपमान आहे. आमचं सगळ्याच म्हणणं आहे की याचं उत्तर स्पष्टीकरण देवेंद्र फडणविस यांनी दिलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT