Shinde Shiv sena vs Thackeray shiv sena Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Elections : ना ठाकरे, ना शिंदे... पुण्यात एकही जागा नाही, शिवसैनिक हतबल; २१ जागांवर कोण कोण उमेदवार? एका क्लिकवर

Pune Vidhan Sabha Election : पुण्यातील २१ जागांपैकी दोन्ही शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. पुण्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

Namdeo Kumbhar

Shinde Shiv sena vs Thackeray shiv sena : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात पोहचले आहे. काही जागांवर तिढा कायम आहे. पुण्यातील परिस्थिती काही वेगळी नाही. पुण्यातील २१ जागांवर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. पुण्यातील जागावाटपामध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. महायुतीने पुण्यात आतापर्यंत १९ जागांवर उमेदवार दिलेत. तर महाविकास आघाडीकडून १३ जागांवर आतापर्यंत एकमत झालेय. महायुती आणि मविआच्या यांच्या पुण्यातील जागावाटपात दोन्ही शिवसेनेला अद्याप एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. (Maharashtra Assembly Election 2024 Candidate List mahayuti vs MVA pune candidate List)

महायुती १९ आणि मविआने १३ जागांवर उमेदवार दिले. पण ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनाला अद्याप एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात दोन्ही शिवसेनेचे अस्तित्व संपलं का? असा सवाल उपस्थित होत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात २१ जागा आहेत. त्यामधील एकही जागा अद्याप दोन्ही शिवसेनेला मिळालेली नाही.

पुणे शहरासह जिल्ह्यात दोन्ही शिवसेनाचा अद्याप एकाही जागेवर उमेदवार घोषित नाही. पुणे शहरात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना जागा मागत आहे, पण एक जागा घेताना दमछाक होत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेला पुण्यात जागा मिळत नसल्याने शिवसैनिक अस्वस्थ आहे. पुण्यात दोन्ही शिवसेना फक्त नावापुरती राहिली का? असा सवाल उपस्थित होत आहे.

पुण्यातील जागा कोणत्या पक्षाला कोणत्या मिळाल्या? कुठे कशी लढत होणार? Maharashtra Assembly Election 2024 Candidate List pune mahayuti vs MVA candidate List

Maharashtra Assembly Election 2024 Candidate List pune mahayuti vs MVA candidate List

पुण्यातील एकूण जागा २१ (कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?)

महायुती

भाजप - ९

शिवसेना शिंदे -००

राष्ट्रवादी (AP) - 10

जाहीर न झालेल्या जागा - २

मविआ -

काँग्रेस - ०३

शिवसेना (ठाकरे) - ००

राष्ट्रवादी(SP) - १०

जाहीर न झालेल्या जागा - ८

शिवसेनाला एक तरी जागा मिळणार का?

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त तीन दिवसांचा वेळ शिल्लक राहिलाय. पुण्यातील पेच कायम आहे. पुण्यात मविआच्या अद्याप ८ जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला दोन जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भोसरी आणि कोथरुड या जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळतील, असे सांगण्यात येत आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला पुरंदरची एकमेव जागा मिळेल, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT