Sharad Pawar vs Ajit Pawar : राज्यातील विधानसभा निवडणुकींसाठीच्या लढती आता जवळपास निश्चित झाल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत काका सरस ठरणार की पुतण्या बाजी मारणार? याची चर्चा राजकारणात सुरु झाली आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत ७६ जागांवर आपले उमेदवार दिलेत, तर अजित पवार यांनी ४९ जागांवर डाव खेळला आहे. सध्याच्या स्थितीनुसार, राज्यात ३२ जागांवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. विधानसभा निवडणुकीत कोण करेक्ट कार्यक्रम करणार? याची चर्चा महाराष्ट्रात रंगली आहे. (NCP vs NCP)
जून २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पुतण्या अजित पवार यांनी ४० आमदारांना हाताशी धरत वेगळी वाट धरली. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह मिळवले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांना नव्या चिन्ह आणि पक्षासह मैदानात उतरावे लागले. लोकसभेला शरद पवार यांनी आपला वरचष्मा दाखवून दिला. लोकसभेला तुतारीचा आवाज घुमला. पण आता विधानसभेला शरद पवार तोच करिष्मा करणार का? याकडे लक्ष लगलेय. मागील दीड वर्षांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. हाच संघर्ष विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळेल. राज्यात ३२ ठिकाणी हे दोन पक्ष आमनेसामने आहेत. कुठे काका आणि पुतणे तर कुठे बाप आणि लेक यांच्यात सामना रंगणार आहे.
Sr. No. | मतदारसंघाचे नाव | राष्ट्रवादी (AP) | राष्ट्रवादी (SP) |
१ | तुमसर | राजू कारेमोरे | चरण वाघमारे |
२ | अहेरी | धर्मरावबाबा आत्राम | भाग्यश्री आत्राम |
३ | बसमत | चंद्रकांत नवघरे | जयप्रकाश दांडेगावकर |
४ | येवला | छगन भुजबळ | माणिकराव शिंदे |
५ | सिन्नर | माणिकराव कोकाटे | उदय सांगळे |
६ | दिंडोरी एस.टी | नरहरी झिरवळ | सुनीता चारोस्कर |
७ | शहापूर | दौलत दरोडा | पांडुरंग बरोरा |
८ | मुंब्रा-कळवा | नजीब मुल्ला | जितेंद्र आव्हाड |
९ | अणुशक्ती नगर | सना मलिक | फहाद अहमद |
१० | जुन्नर | अतुले बेनके | सत्यशील शेरकर |
११ | आंबेगाव | दिलीप वळसे पाटील | देवदत्त निकम |
१२ | शिरूर | माऊली कटके | अशोक पवार |
१३ | इंदापूर | दत्ता भरणे | हर्षवर्धन पाटील |
१४ | बारामती | अजित पवार | युगेंद्र पवार |
१५ | पिंपरी | अण्णा बनसोडे | सुलक्षणा शीलवंत |
१६ | वडगाव शेरी | सुनील टिंगरे | बापु साहेब पठारे |
१७ | हडपसर | चेतन तुपे | प्रशांत जगताप |
१८ | अकोले | किरण लहामटे | अमित भांगरे |
१९ | कोपरगाव | आशुतोष काळे | संदिप वर्पे |
२० | पारनेर | काशिनाथ दाते | राणी लंके |
२१ | अहमदनगर शहर | संग्राम जगताप | अभिषेक कळमकर |
२२ | माजलगाव | प्रकाश दादा सोळंके | मोहन बाजीराव जगताप |
२३ | आष्टी | बाळासाहेब आजबे | मेहबूब शेख |
२४ | परळी | धनंजय मुंडे | राजेसाहेब देशमुख |
२५ | अहमदपूर | बाबासाहेब पाटील | विनायक पाटील |
२६ | उदगीर | संजय बनसोडे | सुधाकर भालेराव |
२७ | करमाळा | संजय शिंदे | नारायण पाटील |
२८ | मोहोळ | यशवंत विठ्ठल माने | सिद्धी रमेश कदम |
२९ | फलटण | सचिन पाटील | दीपक चव्हाण |
३० | चिपळूण | शेखर निकम | प्रशांत यादव |
३१ | चंदगड | राजेश पाटील | नंदिनीताई कुपेकर |
३२ | कागल | हसन मुश्रीफ | समरजितसिंह घाटगे |
३३ | इस्लामपूर | निशिकांत पवार | जयंत पाटील |
३४ | तासगाव-कवठे | संजयकाका पाटील | रोहित पाटील |
बारामतीमध्ये शरद पवार यांनी अजित पवारांविरोधात पुतण्याला मैदानात उतरलेय. बारामतीमध्ये काका आणि पुतण्यामध्ये लढत होत आहे. युगेंद्र पवार हा अजित पवार यांच्या भावाचा मुलगा आहे. या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय.
शरद पवार यांनी परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात मराठा कार्ड खेळले आहे. बीडमध्ये सध्या मराठा आणि वंजारी असा संघर्ष पाहायला मिळतोय, त्यात पवारांनी मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरवलेय.
अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक यांच्याविरोधात शरद पवार यांनी अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली. माझलगावमध्ये प्रकाश सोळंके यांच्याविरोधात मोहन जगताप यांना संधी दिली.भोसरीमध्ये महेश लांडगे यांच्याविरोधात अजित गव्हाणे यांना रिंगणात उतरलवलेय. मोहोळमध्ये यशवंत माने यांच्याविरोधात रमेश कदम यांच्या कन्या सिद्धी कदम यांना संधी दिली. पारनेरमध्ये लंके आणि दाते असा सामना होतोय.अहेरीमध्ये बाप-लेकीचा सामना होत आहे. पवार विरुद्ध पवार लढतीमध्ये कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? हे २३ तारखेला स्पष्ट होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.