Maharashtra Election  
Maharashtra Assembly Elections

Assembly Election:शरद पवारांचा सरकारला ''दे धक्का''; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?

Assembly Election: विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवारांनी कंबर कसलीय. पवारांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका लावलाय. त्यामुळे स्ट्राईकरेट वाढवून पवार निकालानंतर महत्वाच्या भुमिकेत असण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यासाठी पवारांची रणनीती नेमकी कशी असणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Tanmay Tillu

लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं होतं. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मतदारांनी चांगली साथ दिली. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्येही शरद पवारांची राष्ट्रवादी कमी जागा लढवूनही निर्णायक भूमिकेत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी कोणाकोणावर भारी पडणार हेच पाहायचं.

लोकसभा निवडणूकीत काँग्रेसनं राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र अवघ्या 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे पवारांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट अधिक होता. विधानसभेतही शरद पवारांच्या पदरी कमी जागा पडल्यात. मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये राष्ट्रवादी नाही असं विधान पवारांनी केलं होतं. खरं तर पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे.

परिणामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मविआत दुरावा, मतभेद आणि वेगळं समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होतेय. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष निर्णायक भूमिकेत असणार यात नवल नाही.

शरद पवार निर्णायक भूमिकेत

लोकसभेनंतर विधानसभेसाठी पायाभरणी

विधानसभेआधी शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा

पवार विरुद्ध पवार लढतीत शरद पवारांना साथ

शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष निर्णायक भूमिकेत

मराठा मतदारांवर राष्ट्रवादीची भुरळ

लोकसभेच्या निकालानंतर 'महायुती' सावध झालीये.कल्याणकारी योजनांचे धडाधड निर्णय घेत लोकसभेच्या निकालाचे अपयश पुसण्याचा आटोकाट प्रयत्न महायुतीनं केला.अशात निवडणुकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार, हे सांगणे सध्या कठीण आहे.त्यामुळेच निकालानंतर काँग्रेस आणि भाजप वगळता उर्वरित पक्ष हे कोणाशीही 'युती आणि आघाडी' करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे पुढील काळात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक भूमिकेत राहील, असा अंदाज बांधला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malaika Arora: पन्नाशी गाठलेली मलायका अजुनही इतकी फिट कशी?

Maharashtra News Live Updates : गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध - नितीश राणे

Winter Care: थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Chandrapur News : पेट्रोल पंपावर कार्यकर्त्यांना पैशांचे वाटप; भद्रावती येथील प्रकार, पोलिसांनी टाकली धाड

Fortune Powerful people list : फॉर्च्युनच्या यादीत मुकेश अंबानी 12 व्या क्रमांकावर, जगातील शक्तिशाली व्यक्ती कोण?

SCROLL FOR NEXT