Arvind sawant Shaina NC News Arvind sawant Shaina NC News
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : अरविंद सावंत मला 'माल' म्हणाले, शायना एनसींचा गंभीर आरोप|VIDEO

Shaina NC News : शायना एनसी यांनी अरविंत सावंत यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha election 2024 : विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात जोरदार सुरु आहे. मुंबईमधील वातावरण अधिकच तापलेय. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मुंबादेवी येथे प्रचार करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलेय. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धूम सुरु आहे. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी प्रचारादरम्यान वादग्रस्त विधान केलं आहे. अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांना अप्रत्यक्षपणे माल असं संबोधित केलेय. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

अरविंद सावंत काय म्हणाले ?

अमीन पटेल यांच्या प्रचारसभेत अरविंद सावंत शायना एनसी यांना ' माल ' म्हणाले. "आम्हाला इम्पोर्टेड माल नको... आमचा ओरिजनल माल आहे.." असे अरविंद सावंत म्हणाले.

शायना एनसी काय म्हणाल्या ?

एखाद्या स्त्रीला माल शब्द वापरणं म्हणजे तिचा अपमान करणं आहे. जे ठाकरे गटाचे नेते करत आहेत. माल बोलल्याने तुम्हीच आता बेहाल होणार आहात, असे शायना एनसी म्हणाल्या.

शिवसेना शिंदे गटाच्या मुंबादेवीमधील उमेदवार शायना एनसी आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अरविंद सावंतांवर गंभीर आरोप केला. अरविंद सावंत यांनी माल म्हणून उल्लेख केला.यातून त्यांच्या पक्षाची मनस्थिती दिसते. त्यांची विचारधारा दर्सवते. एका महिलेला माल म्हणून संबोधतात..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT