Raju Shetti News Marathi  sakal
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : राजू शेट्टींना धक्का, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट, मोठ्या नेत्याने साथ सोडली

Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच राजू शेट्टी यांना जोरदार धक्का बसला आहे.

Namdeo Kumbhar

Raju Shetti News Marathi : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट पडली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकला. वैभव कांबळे संघटनेतून बाहेर निघताना राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केलाय. राजू शेट्टी हुकुमशाह पद्धतीने वागवतात, असा आरोप वैभव कांबळे यांनी केलाय.

विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी निर्णय घेत असताना स्वाभिमानी संघटनेच्या कुठल्याही नेत्यांना अथवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एककल्ली कार्यक्रम केलेला आहे. राजू शेट्टी हे हुकुमशाह पद्धतीने संघटनेत वागत असल्याने त्यांच्या कारभाराला कंटाळून कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी साम टीव्ही सोबत बोलत असताना आपल्या छातीवरचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला काढून आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम करत असल्याचं जाहीर केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठी फूट पडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी संघटनेला रामराम ठोकला. विधानसभा निवडणुकीत भूमिका घेत असताना राजू शेट्टी यांनी कोणालाच विश्वासात न घेतल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला. कांबळे यांनी आज राजू शेट्टी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवलाय. ऐन विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा नेता सोडून गेल्यामुळे स्वाभिमानी संघटनेला मोठा फटका बसला आहे. राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांच्यासोबत तिसऱ्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

SCROLL FOR NEXT