Manoj Jarange Patil  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : त्रास देणाऱ्याला सोडू नका, उभा कार्यक्रम करा - मनोज जरांगे

Manoj jarange News : मराठा समाजाने एक काम करायचं आहे,तुम्ही उमेदवाराचा आपल्या मागण्याशी सहमत असल्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ घ्या, तो पुरावा आपल्याला कामाला येईल.

माधव सावरगावे, औरंगाबाद

Maharashtra Assembly Election : मनोज जरांगे पाटील दहा दिवसांत १७ जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्याआधी त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. ज्याला पाडायचं त्याला पाडा, असे आवाहन मराठा समजाला केलेय. येत्या दहा दिवसात मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र पुन्हा एकदा पिंजून काढणार आहेत. या दौऱ्यामध्ये गावागावांमध्ये बैठका घेतील, चर्चा करतील. या दौऱ्यात केवळ आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी करणार आहे असं मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. मात्र गावागावातला जिल्हा जिल्ह्यातला त्यांच्या भेटी कुणाला महागात पाडणार याची चर्चा सुरू झाली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत माधव सावरगावे यांनी चर्चा केली आहे. त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

तू मराठ्यांची राख केली. आमच्या डोळ्यासमोर दुसर्‍यांना आरक्षण दिलं आम्हाला दिलं नाही, तू गोरगरिबांच्या नरड्याचा घोट घेतला, अशी टीका फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी केली. 40-50 वर्षात झालं नाही तेवढं नुकसान 5 वर्षात केलं. आंदोलन आमचं सुरू आहे, आरक्षण दुसऱ्याला देतो. याला दुसऱ्याची आई कळत नाही, असा राज्यकर्ता असतो का? थू याच्या सत्तेवर,मराठ्यांचा याने अवमान केला आहे, अशी टीका फडणवीस यांच्यावर केली.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?

लोकांमध्ये संभ्रम ठेवण्याची गरज नाही, आपल्यात मतदानाबाबत संभ्रम नको.

जे स्वार्थासाठी दुसऱ्याच्या नरड्याचा घोट घ्यायला निघाले, ते संभ्रम असण्याबाबतची चर्चा करत आहेत.

समाजाने बरोबर कार्यक्रम लावला आहे. मग संभ्रम असण्याची गरज नाही.

स्पष्ट सांगण्याची गरज नाही, संभ्रम ठेवण्याची गरज नाही, ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा

मराठा समाजाने एक काम करायचं आहे,तुम्ही उमेदवाराचा आपल्या मागण्याशी सहमत असल्याचा पुरावा म्हणून व्हिडीओ घ्या, तो पुरावा आपल्याला कामाला येईल.

गावकऱ्यांनी उमेदवाराकडून लिहून घ्या किंवा व्हिडीओ घ्या. समाजाने कुणाच्या पाठीशी उभे राहायचं हे त्यांनी ठरवावे

काही जण मला बॉण्ड देतात. पण आमचेच काही लोक हा चांगला नाही तो चांगला नाही असं सांगतात.

मराठ्यांनी मतदान वाया घालू नये, याला आणा त्याला आणा असं मी सांगणार नाही

तुम्हाला कोण पाहिजे, तुमच्या आरक्षणासाठी कोण धावून येतोय हे ठरवा, राज्यात आपण कुणालाही पाठिंबा दिलेला नाही.

आपण सगळे आपल्या पुढच्या आंदोलनाची तयारी करू, कुणीही सत्तेत आलं तरी मला आंदोलन करायचं आहे.

मला पूर्ण वेळ मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घालवायचा आहे.

आमचा जीव आंदोलनात आरक्षणात गुंतलेला आहे.

कुणाच्याही सभेला प्रचाराला जाऊ नका.

ज्यांनी आरक्षणाला त्रास दिला त्याला सोडू नका, यांचा उभा कार्यक्रम करा, आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका

ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना सुट्टी नाही, विरोध करणारे कोण हे समाजाला सांगण्याची गरज नाही, मराठा तेवढा हुशार आहे

मी निवडणुकीत समाजापासून अलिप्त झालेलो नाही, लढा सुरू ठेवणं माझी जबाबदारी आहे.

मी आता कारभाराच मराठ्यांच्या हातात दिला आहे आता मराठे गावा-गावात भूमिका ठरवणार, त्यांना माहीत आहे कोण आपलं आहे कोण आपलं नाही, मराठ्यांना त्यांचं त्यांना माहीत आहे फक्त आरक्षणाला विरोध करणारे सोडू नका, एकजुटीने मतदान करा मतदान फुटू देऊ नका पुढे आम्ही सामूहिक आंदोलन करणार आहे.

आपलं कुणीही काहीही करू शकत नाही देवेंद्र फडणवीस देखील आपलं काहीही करू शकत नाही, त्यांना घाबरण्याची गरज नाही.

मी निवडणूक काळात समाजाच्या दर्शनासाठी सगळीकडे जाणार, पण मी आरक्षण लढ्याचीही तयारी करणार आहे.

मी शरद पवारांचा माणूस आहे ही चर्चा कुठेही नाही,असं का?

मला जेवढा दौरा होईल तेवढा दौरा करणार

इथे स्वार्थासाठी लढणारे लोक आहेत, मला राजकारणाचा नाद नाही उभे करण्याच्या नादात पडले असते तर समाजाला खुन्नस दिली असती, एका जातीवर निवडणूक लढवनं सोपं नाही.

दोन वर्षात बघा प्रत्येक घरात एक तरी नोकरीवाला असेल

समाजच आता मालक आहे, त्यामुळे आता कोणताही संभ्रम असणार नाही त्यांच्यावर कोणतंही संकट असणार नाही.

जे वाटत ते करा,पण मराठ्यांचा दरारा कायम ठेवा, एकजुटीने मतदान करा,आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सोडू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT