Jalna vidhan sabha Election 2024 : 
Maharashtra Assembly Elections

Jalana Election : लोकसभेत 'जरांगे फॅक्टर' भोवला, विधानसभेला महायुतीचं काय होणार? वाचा जालना जिल्ह्याचं समीकरण

Jalna vidhan sabha Election 2024 : मनोज जरांगे फॅक्टर, लोकसभेला बदल, विधानसभेला काय होणार? विधानसभेला जालन्याचं गणित कसं असेल?

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे, जालना

Jalna vidhan sabha Election 2024 : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं केंद्रबिंदू ठरलेलं जालन्यात विधानसभेला काय होणार? याची राज्यभरात उत्सकता लागली आहे. मनोज जरांगे यांचं आंदोलन असो किंवा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला विरोध करणार ओबीसी आंदोलन, हे दोन्ही आंदोलनाचे केंद्र जालना जिल्हा राहिला आहे. आंदोलनानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. जालना, भोकरदन ,बदनापूर, घनसावंगी आणि परतुर या पाच मतदारसंघाचा समावेश होतो. जालना जिल्ह्यातील तीन मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात तर दोन मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत. विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल्यानंतर जालन्यात देखील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यातून आपल्याच पक्षाला उमेदवारी मिळेल याची खात्री वाटत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात मोठी रस्सीखेच होणार असून कार्यकर्त्यांचे मनोमिलन करणे देखील पक्षश्रेष्ठींपुढे आव्हान असणार आहे...

जालन्यात शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मोठी राजकीय उलथापालथ झाली. शिवसेनेचे जिल्ह्यातील मोठ नेतृत्व असलेले अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडली, तर राष्ट्रवादीमधील फुटीचा फारसा परिणाम झाला नाही. कारण राष्ट्रवादीचे जिल्ह्यात नेतृत्व करणारे माजी मंत्री राजेश टोपे हे शरद पवारांच्या गटात राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी फुटीचा,जालना जिल्ह्यात फारसा परिणाम झालेला नाही. असे असले तरी यानंतर मराठा-ओबीसी आंदोलन आणि लोकसभेचा निकाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा प्रभावी मुद्दा ठरणार आहे. गेली पंचवीस वर्षे भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा गढ असलेला जालना लोकसभा मतदारसंघ लोकसभेला सरळ सरळ काँग्रेसच्या ताब्यात गेला. परिणामी जिल्ह्यामध्ये काँग्रेस वर्चस्व वाढण्यास मदत मिळाली, अर्थात या बदलाला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव असल्याचा देखील बोललं जातं, एकंदरीत हे सगळे फॅक्टर विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत.

हे आहेत विद्यमान आमदार -

जालन्यात काँग्रेसचे कैलास गोरंट्याल, घनसांवगीत शरद पवार गटाचे राजेश टोपे ,भोकरदनला भाजपचे संतोष दानवे ,परतुरला भाजपचे बबनराव लोणीकर आणि बदनापूरला भाजपचे नारायण कुचे हे विद्यमान आमदार आहेत.

मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाचा प्रभाव -

मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मोठ आंदोलन केलं केलं. याचा परिणाम पुढील काळात राजकीय वातावरणावर देखील झाला, लोकसभेत मराठवाड्यात याचा प्रभाव दिसून आला, याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलन देखील नंतरच्या काळात या जिल्ह्यात उभे राहिलं. मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देऊ नये, यासाठी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाज एकत्रित करायला सुरुवात केली. ज्यामुळे जालना आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात, अनेक राजकारण्यांना आपली भूमिका घेणे अवघड झालं. अनेक मतदारसंघांमध्ये या आंदोलनाचे आपल्या सोयीने अर्थ लावून मतदान पदरात पाडून घेण्यासाठीच्या राजकीय तडजोडी सुरू झाल्या, ज्या आजवर सुरूच आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे वातावरण आपल्या बाजूने कसं आहे, हे दाखवण्याचा आणि भासवण्याचा प्रयत्न देखील करताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील मतदरसंघातील राजकीय स्थिती

2019 मध्ये पाच पैकी तीन जागेवर महायुतीने वर्चस्व मिळवले तर दोन जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणावर सर्वाधिक ताकत भाजपची होती, त्यामुळे हीच ताकत अबाधित ठेवण्याचे अटोकाट प्रयत्न महायुतीकडून सुरू आहेत. ते दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या राज्यातील खराब प्रदर्शनावर बोट ठेवत हे वातावरण कसं प्रतिकूल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत महाविकास आघाडीने देखील कंबर कसली आहे. याचाच परिणाम जालना जिल्ह्यात देखील पाहायला मिळत असून लोकसभेच्या बदलानंतर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

जालना मतदारसंघात महायुतीत कलह होण्याची शक्यता

जालना मतदारसंघ हा पारंपारिक शिवसेनेची जागा आहे, मात्र महायुतीच्या प्रमुख तीन पक्षाने या मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. भाजपकडून रावसाहेब दानवे यांची बंधू भास्कर दानवे हे इच्छुक असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी देखील दावा केलाय. तर ही जागा पारंपारिक महायुतीत शिवसेनेची असल्याने अर्जुन खोतकर देखील याच जागेसाठी आग्रही आहे.

घनसावंगीत राजेश टोपेंना कोण देणार टक्कर?

गेल्या २५ वर्षापासून राजेश टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सेवा निवृत्त सनदी अधिकारी मधुकर राजे आर्दड निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून डॉ. हिकमत उढाण तर भाजपकडून सतीश घाटगे आणि सुनील आर्दड हे इच्छूक आहेत.

कोण देणार लोणीकरांना टक्कर

मागील १० वर्षापासून परतूर विधानसभा मतदारसंघ संघ हा भाजपच्या ताब्यात आहे, बबनराव लोणीकर हे गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघात शिवसेनेची पकड असली तरी हा विधानसभा मतदारसंघ हा तत्कालीन शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपकडे राहिला आहे. परतुर मतदारसंघातून महाविकास आघाडीतून लढण्यासाठी मोठी गर्दी आहे. यात काँग्रेसकडून अविनाश चव्हाण,सुरेशकुमार जेथलिया, बालासाहेब आकात हे इच्छुक आहेत. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल हे देखील इच्छुक आहे.

संतोष दानवेंना कोणाचं आव्हान?

मागील दहा वर्षापासून या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व संतोष दानवे हे करीत आहे. या लोकसभेला रावसाहेब दानवे यांना भोकरदन विधानसभा मतदारसंघात मिळालेली पिछाडीशिवाय मतदारसंघात असलेली नाराजी यामुळे संतोष दानवे यांना आगामी विधानसभा निवडणूक जड जाणार हे निश्चित आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे, शिवसेनेचे नेते रमेश गव्हाड,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,सुरेश गवळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला अध्यक्ष सुरेखा लहाने ह्या महाविकास आघाडीकडून इच्छूक आहेत.

नारायण कुचे तिसऱ्यांदा आमदार होणार का?

बदनापूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. भाजपचे नारायण कुचे मागील दहा वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. बदनापूर मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे यांचा प्रभाव असल्यामुळे नारायण कुचे यांची आगामी विधानसभा निवडणुकीत कसोटी लागणार असल्याचं बोललं जातंय. इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बबलू चौधरी तर उद्धव ठाकरे गटाकडून संतोष सांबरे आणि जगन दुर्गे देखील इच्छुक आहेत.

लोकसभेत रावसाहेब दानवे यांचा 25 वर्षाचा गड ढासळला

जालना लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड पर्यायाने रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र या लोकसभेला काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी या गडाला सुरुंग लावत विजय मिळवला आहे. त्यामुळं तब्बल 25 वर्षानंतर जालन्यात काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी होता आलं आहे.

जालना (विधानसभा)

1) कल्याण काळे काँग्रेस -93756

2) रावसाहेब दानवे भाजप - 83166

लीड कल्याण काळे- 10590

बदनापूर (विधानसभा)

1) कल्याण काळे काँग्रेस -102959

2) रावसाहेब दानवे भाजप - 81487

लीड कल्याण काळे-21472

भोकरदन (विधानसभा)

1) कल्याण काळे काँग्रेस -100013

2) रावसाहेब दानवे भाजप - 99051

लीड कल्याण काळे-962

घनसावंगी( विधानसभा )

1) बंडु जाधव, शिवसेना UBT -89914

2) महादेव जानकर,रासप - 59656

लीड बंडु जाधव- 30258

मंठा -परतूर (विधानसभा )

1) बंडु जाधव ,शिवसेना UBT -85060

2) महादेव जानकर, रासप -59716

लीड बंडु जाधव- 25344

2019 विधानसभेला कुणाला किती मते पडली ?

99,परतूर- मंठा

बबन लोणीकर -106321

सुरेश जेथलिया -80379

100,घनसावंगी

राजेश टोपे -107849

हिकमत उढान -104440

101,जालना

कैलास गोरंट्याल- 91835

अर्जून खोतकर -66497

102,बदनापूर

नारायण कुचे-105312

बबलू चौधरी 86700

103,भोकरदन

संतोष दानवे -118539

चंद्रकांत दानवे -86049

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT