Major police action saam tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 11 लाखांची रोकड जप्त

Assembly Election: राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असताना छत्रपती संभाजी नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Surabhi Jagdish

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून यासाठी सुरुवात झालेली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असताना छत्रपती संभाजी नगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी शहराच्या मुख्य गेटवरून पोलिसांनी ११ लाखांहून अधिकची रक्कम जप्त केली आहे.

स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई

मतदान होण्याच्यापूर्वीच ही घटना समोर आली आहे. यावेळी शहराच्या मुख्य गेटवर पोलिसांकडून ११ लाख २१ हजार रूपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर हर्सूल टी पॉइंट याठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकाने ही कारवाई करत तब्बल 11 लाख 21 हजार रुपये जप्त केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर स्थिर सर्वेक्षण पथकाची हर्सूल टी पॉइंट याठिकाणी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका कारची तपासणी करण्यात आली. यावेळी या गाडीत एका बॅगेमध्ये तब्बल ११ लाख २१ हजार रूपये सापडले आहे. जळगावच्या दिशेने येणाऱ्या कारची चेकिंग करतेवेळेस ही रक्कम आढळून आली आहे. दरम्यान ही रक्कम कोणाकडून आली आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान याबाबत चौकशी सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: यांचा खरा चेहरा समोर आला...सुजय विखेंचा नाव न घेता बाळासाहेब थोरांतावर आरोप

Kedar Dighe: ठाण्यात दारू आणि पैशांच्या पाकीटाचे वाटप, केदार दिघेसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

VIDEO : शिर्डीमध्ये पैसे वाटतानाचा व्हिडीओ व्हायरल | Marathi News

Parli Rada : ऐन थंडीमध्ये परळीत भडका, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला, शरद पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Ajit Pawar News : शर्मिला पवारांचे आरोप धांतात खोटे, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण | Marathi News

SCROLL FOR NEXT