CM Eknath Shinde Shinde Devendra Fadnavis Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : महायुतीत शिवसेनेचं घोडं 25 जागांवर अडलं, शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा!

Maharashtra politics : महायुतीमधील जागावाटपचा पेच अद्याप सुटला नसल्याचे समोर आले आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये २५ जागांचा तिढा आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपने ९९ जागांची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. त्यामुळे महायुतीने मविआला मागे टाकत एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा सुरु झाली होती. पण आता मविआप्रमाणेच महायुतीमध्येही वाद असल्याचे समोर आले आहे. महायुतीमध्ये शिवसेनेचे घोडं २५ जागांवर अडकल्याची समोर आले आहे.

महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये काही जागांवर एकमत होत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत शिवसेनेचं घोडं २५ जागांवर अडून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावणकुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली, पण त्यावर तोडगा निघाला नाही.

भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकित मुख्यमंत्र्यांनी ६० नावांची यादी बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी विद्यमान आमदारांना तिकिट देण्यावर सकारात्मक चर्चा झाली. उर्वरित २५ जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याचे कळते. त्यावर स्थानिक पक्षीय बलाबल, जातिय राजकारण या जागांवर तीन पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

महायुतीमधील जागावाटप पूर्ण झाल्याचे सांगितले जात होतं, पण अद्याप शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये २५ जागांवर एकमत झाले नाही. सूत्रांनी मिळेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षामध्ये चर्चा सुरु आहे. लवकरच यावर तोडगा निघू शकतो. कोणत्याही क्षणी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची पहिली उमेदवारी यादी जाहीर होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT