Bhaskarrao Patil Khatgaonkar Latest News Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : विधानसभेआधी वारं फिरलं, नांदेडचा बडा नेता पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार, भाजपला खिंडार पडणार!

Satish Daud

विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भाजपला धक्क्यांवर धक्के देत असताना दुसरीकडे काँग्रेसने देखील भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे. भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी देखील भाजपात प्रवेश केला होता. दोन बड्या नेत्यांनी अचानक साथ सोडल्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला.

मात्र, तरी देखील लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये काँग्रेसचाच खासदार निवडून आला. आता विधानसभेपूर्वी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राजकीय वारं फिरलं असून भास्करराव खतगावकर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, खतगावकर यांच्यासह डॉ. मीनाताई खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे तसेच अनेक नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. अशोक चव्हाण यांना बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

काही दिवसांपूर्वी भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँगेस प्रवेशाची घोषणा केली होती. खतगावकर यांच्या सुनबाई मीनल खतगावकर यांना काँग्रेसने नायगाव मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन दिल्याने आपण स्वगृही परतणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. आमच्याकडे राहिले तर सुरक्षित राहतील मी इतकं सांगू शकतो, असं चव्हाण यांनी म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

SCROLL FOR NEXT