Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार?

Maharashtra Election: लोकसभेला मराठा आरक्षणाच्या वादाचा महायुतीला मोठा फटका बसला. मात्र आता विधानसभेसाठी मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा समाज कुणाला मतदान करणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जाताहेत. तर जरांगेंच्या माघारीमुळे मराठा समाजाच्या मतदानाचा महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मराठा समाज कुणाला मतदान करणार? याबाबत तर्कवितर्क लढवले जाताहेत....तर जरांगेंच्या माघारीमुळे मराठा समाजाच्या मतदानाचा महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड तापलेला असतानाही मराठा समाज एकाच पक्षाच्या मागे ठामपणे उभा राहत नसल्याचं चित्र आहे. ते नेमकं कसं पाहूया

मराठा बहुल मराठवाड्यात लोकसभेत शिंदे गटाला 1, ठाकरे गटाला 3, शरद पवारांच्या पक्षाला -1, काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. मात्र भाजपला एकही जागा मिळाली नाही. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाचं मतदान लक्षणीय असलं तरी भाजपचे 2 मराठा खासदार निवडून आले आहेत.

1995 पर्यंत मराठा समाज काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहत होता. मात्र त्यानंतर मराठा समाजाचे दिग्गज नेते ज्या पक्षात त्या नेत्यामागे मराठा समाज असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय... तर 2014 मध्ये मराठा समाजाने शिवसेना आणि भाजप युतीच्या पाठीशी राहणं पसंत केलं. त्यानंतर 2019 मध्येही दिग्गज मराठा नेते भाजप आणि शिवसेनेत सहभागी झाल्याने त्याचा फायदा युतीला झाला. 20 वर्षात मराठा आमदारांची संख्या किती? पाहूयात.

20 वर्षांतील मराठा आमदार

2004 मध्ये 140 मराठा आमदार निवडून आले

2009 मध्ये मराठा आमदारांची संख्या 125 पर्यंत खाली आली

2014 मध्ये मराठा समाजाच्या आमदारांची संख्या 132 वर गेली.

2019 मध्ये मराठा आमदारांची संख्या वाढून 137 झाली

लोकसभेला जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याने महायुती आणि महाविकास आघाडीने मराठा फॅक्टरवर विशेष लक्ष केंद्रीत केलंय.. त्यामुळे प्रमुख लढतींमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांची संख्या जास्त असल्याने मराठा समाजाच्या आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र जरांगेंच्या निशाण्यावर फडणवीस असले तरी मराठा समाज नेमका कुणाच्या पाठीशी राहणार? यावर सत्तेचं समीकरण अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT