Maharashtra Assembly Elections

Assembly Election: लातूर ग्रामीणमध्ये रंगणात तिरंगी लढत; धीरज देशमुखांना रमेश कराडांचं आव्हान

Maharashtra Election: 2019 मध्ये एक लाखांपेक्षा जास्त लीडने विजयी झालेल्या धीरज देशमुखांसमोर यंदा भाजपच्या रमेश कराडांनी कडवं आव्हान उभं केलंय.. मात्र लातूर ग्रामीणचं राजकीय आणि जातीय समीकरण कसं आहे? यावरचा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

राज्याचं लक्ष लागलेल्या लातूर ग्रामीण मतदारसंघात विद्यमान आमदार धीरज देशमुखांविरोधात भाजपचे रमेश कराड मैदानात उतरले आहेत. त्यातच मनसेने संतोष नागरगोजेंना रिंगणात उतरवून चुरस वाढवलीय..मात्र कराड आणि देशमुखांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

5 वेळा गोपिनाथ मुंडेंनी प्रतिनिधीत्व केलेल्या आधीच्या रेणापूर मतदारसंघात औसा आणि लातूरमधील गावांचा समावेश करत 2009 मध्ये लातूर ग्रामीण हा नवा मतदारसंघ तयार करण्यात आला. या मतदारसंघावर काँग्रेसने आपलं वर्चस्व कायम राखलंय..मात्र 2019 च्या निवडणूकीत धीरज देशमुखांच्या लॉन्चिंगवेळी देशमुखांविरोधात रमेश कराड इच्छूक असतानाही शिवसेनेने सचिन देशमुखांना रिंगणात उतरवलं. मात्र सचिन देशमुख मॅनेज असल्याचा प्रचार करण्यात आल्याने नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. नेमकं 2019 मधील मतांचं गणित नेमकं कसं होतं? पाहूयात.

2019 मधील मतांचं गणित

धीरज देशमुख, काँग्रेस, 1 लाख 35 हजार 6 मतं

नोटा- 27 हजार 500 मतं

सचिन देशमुख- शिवसेना- 13 हजार 524 मतं

झाले मंचकराव- वंचित- 12 हजार 966 मतं

1 लाख 7 हजार मतांनी धीरज देशमुख विजयी

लातूर ग्रामीण मतदारसंघ हा बीड आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असल्याने या मतदारसंघात जातीय समीकरण महत्वाची आहेत. यामध्ये मराठा, दलित आणि मुस्लीम समाजाने काँग्रेसला साथ दिलीय.

लातूर ग्रामीणचं जातीय समीकरण

मराठा- 1लाख 35 हजार

ओबीसी -85 हजार

मुस्लीम -53 हजार

दलित-46 हजार

लातूर ग्रामीणमध्ये 5 साखर कारखाने आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून देशमुख कुटुंबाचा शेतकऱ्यांशी कनेक्ट आहे. त्याचा फायदा निवडणुकीत दिसून आला. त्यातच यंदा लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काळगेंना लातूर ग्रामीणमधून 17 हजार मतांचं लीड मिळालं.देशमुखांचा आत्मविश्वास वाढला. तर रमेश कराडांनी देशमुखांसमोर आव्हान उभं केल्याने काँग्रेसचा गड भाजप भेदणार की देशमुख पुन्हा बाजी मारणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT