Narendra Modi 
Maharashtra Assembly Elections

PM Modi: बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं; औरंगाबादच्या नामांतरावरून पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

PM Modi In Chhatrapati Sambhajinagar : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली.

Bharat Jadhav

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात यावी,अशी मागणी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आमच्या सरकारने पूर्ण केलं. एकाबाजुला छत्रपती संभाजी महाराज यांना मानणारे तर दुसऱ्या बाजुला औरंजेबला मानणारे लोक असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

आज पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात झंझावत तीन सभा होणार आहेत. यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी मविआवर जोरदार टीका केली. औरंगाबाद शहराच्या नावावरून विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले आमच्या सरकारने बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा पूर्ण केली.

सभेत बोलताना मोदी म्हणाले, संभाजीनगरची ही महान भूमी महाराष्ट्राच्या गौरवशाली धरती आहे. संताने काय केले हे सांगणारी भूमी. लहुजी वस्ताद को प्रणाम. महाराष्ट्राची ही निवडणूक नवे सरकार निवडण्याचे काम नाही. संभाजी महाराज मानणारे तर दुसरी और औरंगजेबाचे कौतुक करणारे लोक आहेत. संभाजीनगर हे नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आघाडी सरकारची अडीच वर्ष सरकार होती. पण तेव्हा नाव बदलायची हिंमत नव्हती.

पण महायुतीने आल्याआल्या ते नामांतर पूर्ण केले. आम्ही बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केले. एकनाथ शिंदे सरकारला ही धन्यवाद देतो. संभाजीनगर बनविण्याचे दुःख झाले ते कॉग्रेस आणि महाविकास आघाडीला. त्या विरोधात कोर्टात गेले. संभाजीमहाराजांच्या हत्यारांमध्ये आदर्श दिसतो. ते महाराष्ट्र संस्कृतीच्या विरोधात आहेत.

पालखी महामार्ग केला. मराठीला अभिजात दर्जा दिला हे कामही भाजपने केले. वैतरणा व उल्हास खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी दिले. जलयुक्त शिवार योजना बनविली. महाविकास आघडीवाले पाण्याच्या थेंबा-थेंबसाठी अडचणी आणतील. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती. त्यामुळे जल स्थर वाढला होता. पण मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकाने पाणी योजना रोखल्या. जळ्युक्त शिवाराची योजना थांबवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Huawei Mate XTs: तीन स्क्रीन फोल्डेबल Huawei Mate XTs लाँच, दमदार प्रोसेसर, प्रिमियम कॅमेरा आणि अनेक फिचर्स

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

SCROLL FOR NEXT