Maharashtra Assembly Elections

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

Assembly Election: विधानसभा निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे नारा देत वातावरण तापवलंय.. मात्र या घोषणेला भाजपमधूनच विरोध होताना पहायला मिळतोय.. शिस्तबद्ध भाजपमध्ये हा विरोध का होतोय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

भाजपनं महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखर करण्यासाठी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला खरा...मात्र आता या नाऱ्याला भाजपमधूनच विरोध होऊ लागलाय. पंकजा मुंडे यांच्या नंतर आता अशोक चव्हाण यांनीही बटेंगे तो कटेंगेच्या नॅरेटीव्हला विरोध दर्शवलाय. विशेष म्हणजे हा भाजप नेत्यांचा नारा नसल्याचा खुला दावा त्यांनी केलाय. त्यामुळे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या नाऱ्यावरून भाजपमधले अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.

विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यालाच पुढे नेत पंतप्रधान मोदींनी एक है तो सेफचा नारा दिला. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीनंच महाराष्ट्रात कट्टर हिंदुत्त्वाचं नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कडक पक्षशिस्त असलेल्या भाजपमध्ये काही नेत्यांनी खुला विरोध केलाय. या नाऱ्याविरोधात कोणता नेता काय म्हटला तेही पाहूयात..

बटेंगे-कटेंगेला भाजपामधूनच विरोध

बटेंगे-कटेंगे घोषणेची महाराष्ट्रात आवश्यकता नाही -पंकजा मुंडे

बटेंगे तो कटेंगे या घोषणेचं मी समर्थन करू शकत नाही - राधाकृष्ण विखे पाटील

मुळात महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवारांनीही यापूर्वीच ही घोषणा महाराष्ट्रात चालणार नसल्याचं विधान केलंय. तर या सर्व नाराजांना घोषणेचा अर्थच समजला नसल्याचं फडणवीसांचं म्हणणंय.

भाजपने धार्मिक धृवीकरणासाठी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे घोषणेला आधी महाविकास आघाडीने विरोध केला होता.मात्र आता भाजप आणि महायुतीतील मित्रपक्षही विरोध करायला लागल्याने भाजपची डोकेदुखी वाढलीय.. त्यामुळे बटेंगे तो कटेंगेच्या नॅरेटीव्हचा भाजपला फायदा होणार की यामुळे भाजपच्या मतांमध्ये फाटाफूट होणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

Ulhasnagar : उल्हासनगर पोलिसांची मोठी कारवाई! देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त ; आरोपीचं उत्तर प्रदेश कनेक्शन

Kurkure Momos Recipe: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल कुरकुरे मोमोज कसे बनवायचे? वाचा सोपी रेसिपी

Hardik Pandya: मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्यामध्ये बिनसलं? काय आहे नेमकं सत्य, वाचा

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

SCROLL FOR NEXT