Maharashtra Election 
Maharashtra Assembly Elections

Nashik Politics: महायुतीत चाललंय काय? दादा भुसेंच्या निकटवर्तीय नेत्याने फुंकली 'तुतारी'; भाजपच्या उमेदवाराला पक्षातूनच आव्हान

Maharashtra Election: भाजपने पश्चिम मतदारसंघात महायुतीकडून सीमा हिरे यांना उमेदवारी दिल्यानंतरही भाजपच्या ४ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी ठरवलेल्या उमेदवारालाही आव्हान पक्षातील नेत्यांकडून मिळत आहे.

Bharat Jadhav

विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीमध्ये गडबड घोटाळा उडालेला दिसत आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही नेत्यांनी पक्षाकडून उमेदवारी दिलेल्या नेत्यांविरोधात दंड थोपटले आहेत. तर काहींनी थेट दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या आहेत. महायुतीतील शिंदे गटाला मोठा फटका बसलाय. शिवसेना नेते दादाजी भुसे यांचे निकटवर्तीय नेते उदय सांगळे यांनी तुतारी हाती घेत भुसेंना मोठा धक्का दिलाय. उदय सांगळे हे सिन्नर विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत आहे. महायुतीमधील पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होत आहेत. आज नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांचे पती आणि सिन्नर पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

सांगळे हे सिन्नर विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारीचा शब्द मिळाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान उदय सांगळे यांना उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस ( SP) विरुद्ध राष्ट्रवादी ( AP ) चे माणिकराव कोकाटे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे भाजपमधील उमेवादवारीचा वाद चांगलाच उफाळून आलाय. पक्षश्रेष्ठींनी ठरवलेला उमेदवाराविरोधात स्थानिक नेत्यांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलय. भाजपने पश्चिम मतदारसंघात महायुतीकडून सीमा हिरे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लगलाय. भाजपच्या ४ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने भाजपचं टेन्शन वाढलंय. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी २१ उमेदवारांनी ३७ उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

भाजपच्या दिनकर पाटील, प्रदीप पेशकार, शशिकांत जाधव हे भाजपचे नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत. दरम्यान नाशिक पश्चिममध्ये भाजप नेते दिनकर पाटील विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. सीमा हिरे यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे. निर्धार मेळावा घेत दिनकर पाटील उमेदवारीवर ठाम आहेत. हे वय थांबायचे नाही लढायचे आहे... भाजप पक्ष श्रेष्ठींनी समजूत काढली तरी निर्णय मागे घेणार नाही. लोकसभेला थांबलो मात्र विधानसभेला थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया दिनकर पाटील यांनी दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Shinde Group Candidate List: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, ४५ जणांना उमेदवारी; कुणाकुणाला संधी? वाचा..

Anil Deshmukh: 'डायरी ऑफ होम मिनिस्टर'; पुस्तकातून अनिल देशमुखांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Assembly Election: पुण्यात कारमध्ये सापडली 5 कोटींची रोकड; पोलीस, निवडणूक आयोग अधिकाऱ्यांचं मात्र मौन

Maharashtra Election : अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना संदिप देशपांडे देणार टक्कर; वाचा मनसे उमेदवारांची यादी

Maharashtra News Live Updates: खडकवासलामधून मयुरेश वांजळे यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर

SCROLL FOR NEXT