Chandgad Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

SAAM Exit Poll : चंदगडमध्ये नंदिनी बाभूळकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Chandgad Constituency: चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पारडं जड दिसत आहे. याठिकाणी नंदिनी बाभूळकर या संभाव्य आमदार असू शकतात.

Priya More

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. आता शनिवारी निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या मतदारसंघाचा आमदार कोण होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. अशामध्ये सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे.

सकाळच्या एक्झिट पोलनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पारडं जड दिसत आहे. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार नंदिनी बाभूळकर या संभाव्य आमदार असू शकतात. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघामध्ये नंदिनी बाभूळकर, राजेश पाटील आणि शिवाजी पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली. शिवाजी पाटील देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. महायुतीमधून बाहेर पडून त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नंदिनी बाभुळकर या १० ते १५ वर्षांपासून या मतदारसंघामध्ये काम करत आहेत. त्या बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या आहेत. बाबासाहेब कुपेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे नेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि आता त्यांची मुलगी नंदिनी यांनी निवडणूक लढवली आहे. चंदगडमध्ये नंदीता बाभूळकर यांना सर्वात जास्त पसंती मिळत असून त्यांना संभाव्य आमदार म्हणून पाहिले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

अमेरिकेत मराठी माणूस पंतप्रधान? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा|VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी आमदार भाजपच्या वाटेवर, सांगोल्यात मोठी राजकीय घडामोड

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या शिवणगाव मध्ये पुन्हा भूकंप सदृश्य धक्के

Maharashtra Politics: महापालिका निवडणूक जाहीर होताच ठाण्यात राजकीय भूकंप, महायुतीतला प्रमुख पक्ष फुटणार

SCROLL FOR NEXT