kalyan Politics  Saam tv
Maharashtra Assembly Elections

kalyan Politics : कल्याण पश्चिमवरून महायुतीतच रस्सीखेच; महाविकास आघाडीसह मनसेचीही फिल्डिंग, अब की बार... कोण जिंकणार?

kalyan west assembly constituency : कल्याण पश्चिमवरून महायुतीतच रस्सीखेच पाहायला मिळत आहे. या जागेसाठी महाविकास आघाडीसह मनसेनेही फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

Vishal Gangurde

कल्याण : आगमी विधानसभा निवडणुकीमुळे कल्याण-डोंबिवलीमधील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीसह घटक पक्षांमधील नेत्यांनी राज्यातील विविध मतदारसंघावर दावा करण्यात सुरुवात केली आहे. यामध्ये कल्याण पश्चिमचाही समावेश आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर मतदारसंघातील राजकीय परिस्थितीही बदलून गेली आहे. आगामी निवडणुकीमुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात बंडाळीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे यंदा होणाऱ्या निवडणुकीत बदललेल्या राजकीय समीकरणामुळे विधीमंडळात कल्याण पश्चिममधील मतदारांचे कोण नेतृत्व करणार, याची अनेकांना उत्सुकता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत नोव्हेंबर होण्याची शक्यता बळावल्याने राजकीय नेत्यांमध्ये बंडखोरी सुरु झाली आहे. अनेक राजकीय तिकीटाच्या आशेने एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करू लागले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्येही फार वेगळी परिस्थिती नाही. कल्याण-डोंबिवलीमधील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नेत्यांच्या बंडाळीची शक्यता असल्याने नेत्यांना बंड शमवून पदाधिकाऱ्यांची समजूत काढावी लागणार आहे. या बंडखोरीमुळे महायुतीसहित महाविकास आघाडीच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे विश्वनाथ भोईर ६५,४८६ मते मिळवून विजयी झाले. अपक्ष उमेदवार नरेंद्र बाबुराव पवार यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. तर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नरेंद्र बाबुराव पवार हे ५४,३८८ मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या जगन्नाथ साळवी यांचा पराभव केला होता. नरेंद्र बाबुराव पवार अवघ्या २,२१९ मतांनी विजयी झाले होते.

महायुतीत रस्सीखेच

कल्याण पश्चिम मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर हे आमदार आहेत. त्यामुळे शिंदे गटाने मतदारसंघावरचा दावा कायम ठेवला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातून इच्छुकांची संख्या वाढत आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील, शिवसेना पदाधिकारी श्रेयस समेळ यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छा दर्शवली आहे.

दुसरीकडे भाजपनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पवार हे या मतदारसंघातून निवडणूक इच्छुक आहेत. त्यामुळे एकंदरीतच कल्याण पश्चिम ही जागा कुणाच्या वाटायला जाणार हे पाहणं आता महत्त्वाचा ठरणार आहे.

महाविकास आघाडीतून कोणाचा दावा?

महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात ठाकरे गटाचे सचिन बासरे हे इच्छुक आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी या देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघाची जागा कोणाच्या वाट्याला जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मनसेकडून कोणाला उमेदवारी?

दुसरीकडे कल्याण पश्चिम मतदारसंघात मनसेचे प्रकाश भोईर हे २००९ साली निवडून आले होते. मात्र त्यानंतर झालेल्या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले. या मतदारसंघात मनसेची देखील ताकद आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघात मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यंदा मनसे या या मतदारसंघात उमेदवार देणार का हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav: युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर २५ राउंड गोळीबार; दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडल्या, पोलिसांचा तपास सुरु

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT