Jalgaon Election: 
Maharashtra Assembly Elections

Jalgaon Election: पाचोऱ्यात मविआच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक, आमदारावर आरोप

Jalgaon Election: मविआचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या गाडीवर हल्ला झालाय. त्यांच्या निर्मल सीड्सची गाडीवर हल्ला झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय महाजन, साम प्रतिनिधी

जळगावमधील पाचोऱ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांच्या गाडीवर काही लोकांनी दगडफेक केलीय. वैशाली सूर्यवंशी यांची निर्मल सीड्सची कारवर गुंडांनी दगडांनी हल्ला केला. या दगडफेकीत त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटननेनंतर प्रतिक्रिया देताना वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या, बाहेरचे गुंड पाचोऱ्यात आले आहेत. अशा लोकांना आणून निवडणूक अधिकाऱ्यांनी याची चौकशी झाली पाहिजे वैशाली सूर्यवंशी यांची मागणी केलीय.

या दगडफेक प्रकरणावर माहिती देताना, वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या, आमची निर्मल सीड्सची गाडी शेतातून येत होती. त्यावेळी आमच्या गाडीवर दगडफेक झाली. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास स्वामी लॉन्स येथे काही गुंडांनी गाडीची तोडफोड केलीय. हे गुंड बिहार, मध्यप्रदेशमधील असून त्याच्या मदतीने या काळात कोणता उद्योग उभारत आहेत. कुठल्या ना कुठल्या गोष्टी करून आमदारांनी बोगस मतांसाठी धडपड चालवली असल्याचा आरोप वैशाली सूर्यवंशी यांनी केलाय.

याची चौकशी झाली पाहिजे. हे गुंड आमदाराचे होते. निर्मल सीड्सची गाडी एका शेतात गेली होती. दुपारी ही गाडी परतत असताना स्वामी लॉन्सजवळ गुंडांनी गाडीवर दगडफेक केली. हे गुंड मतदारसंघात दहशत निर्माण करण्यासाठी आणले आहेत का? तसेच आयटीचे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले आहेत का? असा सवाल सूर्यवंशी यांनी केलाय.

दरम्यान या दगडफेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटील यांनी सर्व आरोप खोडून लावलेत. दररोज आमचे विरोधक वेगवेगळे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न पराभव समोर दिसत आहेत. त्यामुळे आरोप होत असल्याचा दावा किशोर पाटील यांनी केलाय. दररोज आमचे विरोधक वेगवेगळे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न पराभव समोर दिसत आहेत. त्यामुळे आरोप होत असल्याचा दावा किशोर पाटील यांनी केलाय.

अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक

नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली.

या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विरारमध्ये राडा, डहाणूत पक्षप्रवेश; मतदानापूर्वी बविआ उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश, VIDEO

Maharashtra News Live Updates: बविआचे आमदार क्षितिज ठाकूर यांविरोधात गुन्हा दाखल

Vinod Tawde: भाजप नेत्यानं टीप दिल्याचा हितेंद्र ठाकूर यांचा दावा; विनोद तावडे म्हणाले, कारमध्ये काय चर्चा झाली मलाच माहिती

Devendra Fadnavis : विनोद तावडेंनी पैसे वाटले नसून त्यांचावरच हल्ला झालाय; विरार प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Election : मोदीजी, हे ५ कोटी कुणाच्या 'सेफ'मधून निघाले? राहुल गांधींच्या प्रश्नावर विनोद तावडे म्हणाले, तुम्ही स्वतः नालासोपाऱ्यात या!

SCROLL FOR NEXT