Sharad Pawar vs Ajit Pawar Diwali Padwa  
Maharashtra Assembly Elections

Pawar Diwali Padwa : साहेब की दादा, कुणाचा दिवाळी पाडवा जोरदार? बारामतीकर काटेवाडी अन् गोविंदबागेत जमले VIDEO

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीमध्ये यंदा दोन पाडवे होत आहेत. वेगळी राजकीय भूमिका घेतलेल्या अजित पवार यांनी आता काटेवाडीमध्ये दिवाळी पाडवा आयोजित केलाय. शरद पवार यांचा पाडवा गोविंदबाग येथेच होतोय.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar vs Ajit Pawar Diwali Padwa : बारामतीच्या पाडव्याला ५० वर्षांची परंपरा आहे. पण परंपरेला यंदा तडा गेलाय. अजित पवार यांनी काठेवाडीमध्ये आपला वेगळा पाडवा आयोजित केलाय. राजकारणात वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता अजित पवार यांनी वेगळा दिवाळी पाडवा आयोजित केलाय. त्यामुळे यंदापासून बारामतीमध्ये दोन दिवाळी पाडवे साजरे होतील. अजित पवार यांचा पाडवा काठेवाडीत होतोय, तर शरद पवार गोविंदबागमध्ये कार्यकर्त्यांना भेटत आहेत. सकाळपासून दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. (pawar family diwali padwa baramati)

गोविंदबागेत शरद पवार कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना भेटत आहेत तर काटेवाडीमध्ये अजित पवार यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून कार्यकर्ते आणि पदाधिकांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे.गेल्या अनेक पिढ्या कार्यकर्त्यांच्या असतील किंवा पदाधिकाऱ्यांच्या असतील साहेबांना आणि दादांना भेटत आहेत.

शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते, नेत्यांच्याही रांगा -

गोविंद बागेत शरद पवार यांना भेटण्यासाठी पहाटेपासून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. शरद पवार यांच्यासह युगेंद्र पवार आणि सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित होत्या. पवार कुटुंबाच्या दिवाळी पाडव्याला ५० वर्षांची परंपरा आहे.

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शरद पवार यांना भेटण्यासाठी गोविंद बागेत दाखल झाले होते. ⁠विलास लांडे यांच्या कार्यकर्त्यांच्या हाती आपकी बार शरद पवार सरकारचे बोर्ड हातात होते. त्याशिवाय जिल्हाअध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यासह अनेकांनी उपस्थिती दर्शवली होती.

फलटणचे संजीव राजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर,कराडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांनीही उपस्थिती लावत शरद पवारांची भेट घेतली.

sharad pawar vs Ajit pawar diwali padwa अजित पवारांचा काटेवाडी पाडवा -

काठेवाडीमध्ये अजित पवार यांनी दिवाळी पाडवा आयोजित केलाय. अजित पवारांना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. अजित पवार,सुनेत्रा पवार,पार्थ पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. अजित पवार यांनीही कार्यकर्त्यांना भेटत शुभेच्छांचा स्वीकार केला.

बारामतीमध्ये काका-पुतण्यामध्ये थेट लढत -

लोकसभेला नणंद भावजय यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेला विजय मिळवला होता, त्यांना बारामतीमध्ये मोठं मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे अजित पवार यांना विधानसभा जड जाणार का? अशी चर्चा होता. बारामतीमध्ये अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उतरवलेय. बारामतीमध्ये काका आणि पुतण्या यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT