EVM हॅकिंगची भीती, कडाक्याच्या थंडीत कार्यकर्त्यांचं जागरण

EVM Tampering Fear: राज्यात ईव्हीएम छेडछाडीची भीती वाढल्याने कार्यकर्ते कडाक्याच्या थंडीत स्ट्राँगरुमबाहेर शेकोट्या पेटवून रात्रभर पहारा देत आहेत. 21 डिसेंबरच्या मतमोजणीपूर्वी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

21 डिसेंबरला मतमोजणी असली तरी जिल्ह्याजिल्ह्यात कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून ईव्हीएमची राखण करत आहेत... कार्यकर्त्यांनी स्ट्राँगरुमबाहेर शेकोट्या का पेटवल्या आहेत. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

पाहिलंत...हा खडा पहारा सुरुय नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीनंतर जिल्ह्याजिल्ह्यात मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरुमबाहेर.....आणि त्याला कारण ठरलंय ईव्हीएमसोबतच्या छेडछाडीची शंका... यामुळेच आता कार्यकर्ते कडाक्याच्या थंडीत स्ट्राँगरुमबाहेर पहारा देत आहेत...

खरंतर देशभरात ईव्हीएमविरोधात शंकेचं मोहोळ उठलंय... विरोधी पक्ष ईव्हीएमवर शंका घेत आहेत... तोच धागा पकडून विरोधी पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते स्ट्राँगरुमबाहेर शेकोटी पेटवून पहारा देत असल्याचं चित्र आहे. सोलापूरच्या मोहोळ, बीड, अमरावती, जळगावच नाही तर राज्यात अनेक जिल्ह्यात स्ट्राँगरुमबाहेर पहारा देण्याचं काम पोलिसांसोबत कार्यकर्ते इमाने इतबारे करत आहेत...हे काम एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याप्रमाणे कार्यकर्ते तीन शिफ्टमध्ये करत आहेत... एवढंच नाही तर जेवणाचा बेतही कार्यकर्ते स्ट्राँग रुमबाहेरच करत आहेत... त्यामुळे 19 दिवस डोळ्यात तेल घालून ईव्हीएमची राखण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर 21 डिसेंबरला मतमोजणीनंतर गुलाल पडणार का? याचीच उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com