sada sarvankar news : गेल्या काही दिवसांपासून सदा सरवणकर माहीममधून माघार घेणार असल्याच्या चर्चा होत्या. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी बातचीत केली, त्यांना विधानपरिषद देणार..या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. माहीममध्ये आता तिरंगी लढत होणार आहे. अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिलेदार येथे मैदानात आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना माहीम मतदारसंघाचा तिढा स्पष्ट केला.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशी युती होऊ द्या, असे राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरे नंतर चर्चा करणार होते. पण त्यांनी थेट उमेदवार दिला. त्यामुळे माहीममध्ये आमचा दोन ते तीन टर्मचा उमेदवार आहे. कार्यकर्तेही उत्साही आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना माहीममधून लढण्याचे संकेत दिले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी थेट उमेदवार दिला. आमचाही तिथे दोन-तीन टर्मचा आमदार आहे. आमचा जुना कार्यकर्ता आहे. त्यांच्यासोबतही माझं बोलणं झालं. सदा सरवणकर यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास उत्साही आहेत. कार्यकर्त्यांना नजरअंदाज करुन जमत नाही. कार्यकर्त्यांचे मनोबल तुटू न देणं, हे नेत्याचं काम आहे. आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.