Maharashtra Lok Sabha Result Prediction Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: काँग्रेस-भाजपची थेट लढत, 'या' 76 जागा ठरवणार, महाराष्ट्रात कुणाचं येणार सरकार?

Congress vs BJP Vodhan Sabha Election : काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये ७६ जागांवर लढत होणार आहे, या जागाच महाराष्ट्राचे पुढील सरकार ठरवणार आहेत.

Namdeo Kumbhar

Congress vs BJP Maharashtra Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सुरु आहे. महायुती आणि मविआ अशी टक्कर असली, तरी खरी लढत काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षामध्ये आहे. २८८ मतदारसंघापैकी ७६ मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये लढत होत आहे. यामधील ३६ जागा या विदर्भातील आहेत. याच ७६ जागा महाराष्ट्रातील पुढील सरकार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

भाजपसमोर कुणाचं किती जागांवर आव्हान?

राज्यात सर्वाधिक जागा भाजप लढत आहे. मविआच्या २८७ उमेदवारांपैकी भाजपने १४८ जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. एकनाथ शिंदेंची शिवसेना ८० तर अजित पवार यांची राष्ट्रवादी ५२ जागांवर नशीब अजमावत आहे. विभागानुसार, पाहिले तर भाजप विदर्भात ४७, पश्चिम महाराष्ट्र ३२, उत्तर महाराष्ट्र १७, मराठवाडा १९ आणि मुंबई, ठाणे-कोकणात ३३ जागांवर लढत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०२, शिवसेना (ठाकरे) ९६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ८७ जागांवर मैदानात उतरले आहेत. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये ३० जागांवर लढत होत आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपचा सामना ३९ जागांवर होत आहे. भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार ७६ जागांवर एकमेकांसमोर उभे आहेत. शिरपूर, डहाणू आणि पनवेलमध्ये भाजप CPI, CPI(M)आणि PWPI यांच्यासोबत लढत आहे.

विदर्भात ३६ जागांवर आमनेसामने -

विदर्भात भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये काटें की टक्कर होणार आहे. विदर्भात काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये ३६ जागांवर लढत होत आहे. विदर्भात राज्यातील दिग्गज नेते विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे,नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुधीर मनगुंटीवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. भाजप आणि काँग्रेसची विदर्भात प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विदर्भात काँग्रेसची ताकद पुन्हा वाढली, यंदा काय होणार?

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा विदर्भात आली होती. त्याचा फायदा लोकसभेला झाल्याचे दिसले. लोकसभेला विदर्भातील दहा जागांपैकी काँग्रेसने पाच जागांवर विजय मिळवला होता. त्याशिवाय लोकसभेच्या एकूणच कामगिरीवर काँग्रेसला फायदा झाला होता. १७ जागांपैकी १४ जागांवर विजय मिळवत काँग्रेस महाराष्ट्रातील आघाडीचा पक्ष ठरला होता. भाजपला विदर्भात फक्त दोन जागांवर विजय मिळाला तर २८ पैकी राज्यात ९ खासदार निवडून आले. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा विदर्भाकडे आपला मोर्चा वळवलाय.

Congress vs BJP candidate list maharshtra marathi

मतदारसंघाचे नावभाजपकाँग्रेस
शहादाराजेश पाडवीराजेंद्रकुमार गावित
नंदुरबारविजयकुमार गावितकिरण तडवी
धुळे ग्रामीणराम भदाणे कुणाल पाटील
शिरपूरकाशिराम पावराविलास पावरा
रावेरअमोल जावळेधनंजय चौधरी
भुसावळसंजय सावकारेराजेश मानवतकर
मलकापूरचैनसुख संचेतीराजेश एकडे
चिखलीश्वेता महालेराहुल बोंद्रे
खामगावआकाश फुंडकरराणा सनदा
जळगाव (जामोद)संजय कुटेस्वाती वाकेकर
अकोटप्रकाश भारसाकलेमहेश गणगणे
अकोला पश्चिमविजय अग्रवालसाजिद खान
धामणगाव रेल्वेप्रताप अडसळप्रो.विरेंद्र जगताप
तिवसाराजेश वानखडेयशोमती ठाकूर
मेळघाटकेवलराम काळेडॉ. हेमंत चिमोटे
अचलपूरप्रविण तायडेबबलूभाऊ देशमुख
देवळीराजेश बकानेरणजीत कांबळे
वर्धापंकज भोयरशेखर शेंडे
सावनेरआशिष देशमुखअनुजा केदार
उमरेडसुधीर पारवेसंजय मेश्राम
नागपूर दक्षिण पश्चिमदेवेंद्र फडणवीसप्रफुल गुडधे
नागपूर दक्षिणमोहन मातेगिरिश पांडव
नागपूर मध्यप्रवीण दटके बंटी बाबा शेळके
नागपूर पश्चिमसुधाकर कोहळेविकास ठाकरे
नागपूर उत्तरमिलिंद मानेनितीन राऊत
कामठीचंद्रशेखर बावनकुळेसुरेश भोयर
साकोलीअविनाश ब्राह्मणकरनाना पटोले
गोंदियाविनोद अग्रवालगोपालदास अग्रवाल
आमगावसंजय पूरमराजकुमार पुरम
आरमोरीकृष्णा गजबेरामदास मसराम
गडचिरोलीडॉ. मिलिंद नरोटेमनोहर पोरेटी
राजुरादेवराव भोंगळेसुभाष धोटे
चंद्रपूरकिशोर जोरगेवार प्रवीण पाडवेकर
बल्लारपूरसुधीर मुनगंटीवारसंतोषसिंह रावत
ब्रम्हपुरीकृष्णालाल सहारेविजय वडेट्टीवार
चिमूरबंटी बागडियासतीश वारजूकर
वरोराकरण देवतळे प्रवीण काकडे
राळेगावअशोक उडकेवसंत पुरके
यवतमाळमदन येरवरअनिल मांगुलकर
दिग्रससंजय राठोडमाणिकराव ठाकरे
आर्णीराजू तोडसमजितेंद्र मोघे
उमरखेडकिशन वानखेडेसाहेबराव कांबळे
भोकरश्रीजया चव्हाणतिरुपती कदम-कोंडेकर
नायगावराजेश पवारमिनल पाटील
देगलूरजितेश अंतापूरकरनिवृत्तीराव कांबळे
मुखेडतुषार राठोडहणमंतराव पाटील
फुलंब्रीअनुराधा चव्हाणविलास औताडे
औरंगाबाद पूर्वअतुल सावेलहू शेवाळे
चांदवडराहुल अहिरेशिरीषकुमार कोतवाल
नालासोपाराराजन नाइकसंदीप पांडे
वसईस्नेहा दुबे विजय पाटील
भिवंडी पश्चिममहेश चौघुलेदयानंद चोरघे
मीरा भाईंदरनरेंद्र मेहतासय्यद हुसैन
कांदिवली पूर्वअतुल भातखळकरकाळू बधेलिया
चारकोपयोगेश सागरयशवंत सिंग
मालाड पश्चिमविनोद शेलारअस्लम शेख
अंधेरी पश्चिमअमित साटमअशोक जाधव
वांद्रे पश्चिमआशिष शेलारआसिफ झकेरिया
सायन कोळीवाडाकॅप्टन आर. तमिल सेल्वनगणेश यादव
कुलाबाराहुल नार्वेकरहीरा देवासी
शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळेदत्तात्रय बहिरट
पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळेरमेश भागवे
कसबा पेठहेमंत रासनेरवींद्र धंगेकर
लातूर ग्रामीणरमेश कराडधीरज देशमुख
लातूर शहरअर्चना चाकूरकरअमित देशमुख
निलंगासंभाजी पाटील निलंगेकर अभय साळुंखे
तुळजापूरराणा जगजितसिंह पाटीलकुलदीप धीरज
सोलापूर शहर मध्यदेवेंद्र कोटे चेतन नरोटे
सोलापूर दक्षिणसुभाष देशमुखदीलीप माने
पंढरपूरसमाधान आवताडेभगीरथ भालके
कराड दक्षिणअतुल भोसलेपृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिणअमोल महाडीकऋतुराज पाटील
मिरजसुरेश खाडेसागर वनखडे
सांगलीसुधीर गाडगीळपृथ्वीराज पाटील
पलूस-कडेगावसंग्राम देशमुख डॉ. विश्वजीत कदम
जतगोपीचंद पडळकर विक्रमसिंह सावंत
एकूण

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता. विदर्भात मोठं यश मिळाले होते, ६२ पैकी ४४ जागा एकहाती जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजपला विदर्भात २९ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुले २०२४ च्या निवडणुकीत भाजपला विदर्भात किती जागांवर विजय मिळतो, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेय.

२०२४ च्या निवडणुकीत भाजपसाठी आता आरएसएस नव्या रणनितीसह मैदानात उतरलेय, विशेषकरुन विदर्भात त्यांनी जास्त लक्ष केंद्रीत केलेय. विदर्भात मजबूत होईल, असा भाजपला विश्वास आहे. त्यासाठी भाजपने ओबीसी आणि दलित मतदारांवर विशेष लक्ष ठेवलेय. मागील सहा महिन्यात भाजपने २८८ मतदारसंघात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विशेष टीमने काम केलेय.

भाजपचा संघटनात्मकदृष्ट्या भक्कम पाया आहे, त्यामुळे विदर्भावर अवलंबून राहणे स्वाभाविक आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यासह राज्यातील भाजपचे सर्वोच्च नेतृत्व विदर्भातील आहे. ज्यामुळे या प्रदेशाला एक वेगळी ओळख मिळाली आहे, असे भाजपमधील एका नेत्याने इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले.

काँग्रेसनेही विदर्भात आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. दलीत, मुस्लीम आणि कुनबी व्होट बँकमुळे लोकसभेला काँग्रेसला मोठा फायदा झाला होता. त्याशिवाय तरुणांसाठी नोकऱ्यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे. यामुळेविदर्भात काँग्रेसला मोठा फायदा झालेला. दरम्यान, बेरोजगारीमुळे फक्त विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तरुणांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. सरकारने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे नाना पटोले म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whats App युझर्ससाठी आनंदाची बातमी, प्रेमी जोडप्यांसाठी चॅटिंग झालं सोपं

Maharashtra News Live Updates: उल्हासनगरात गोदामाला भीषण आग, आकाशात धुरांचे लोट

Nandurbar Accident : नंदूरबारमध्ये भरधाव वाहनाने ३ दुचाकींना चिरडले; अपघातात ५ जणांचा मृत्यू, ऐन दिवाळीत कुटुंबांवर शोककळा

Maharashtra Politics : पाडवे दोन, भाऊबीज एक? बारामतीत पवार कुटुंबीयांचे पहिल्यांदाच दिसले २ पाडवे, पाहा व्हिडिओ

Nana Patole : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्टिफिकेट देण्यापेक्षा....; नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना खणखणीत टोला

SCROLL FOR NEXT