CM Eknath Shinde Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संतापलेल्या शिंदेंनी रस्त्यावर उतरत थेट काँग्रेस कार्यालयात जाऊन जाब विचारला. यामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Tanmay Tillu

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे जोरदार राजकारण रंगलंय. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरशीची लढत होतेय..अशातच एकनाथ शिंदेंचा रुद्रावतार पाहायला मिळाला. कुठे घडला हा प्रकार आणि काय घडलंय. पाहूया...

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष तीव्र झाला आहे. याचे प्रत्यय सोमवारी मुंबईच्या चांदिवली परिसरात आला. या परिसरातून सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. तेव्हा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'गद्दार, गद्दार'च्या घोषणाही देण्यात आल्या. तसेच संतोष कटके या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून अपशब्द वापरले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संतापाचा पारा चढला.

संतापलेल्या शिंदेंनी रस्त्यावर उतरत थेट काँग्रेस कार्यालयात जाऊन जाब विचारला. यामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ताफा अडवणाऱ्या संतोष कटके तरुणाला मातोश्रीवर बोलावून त्याचं कौतुक केलं. संतोष कटकेने ठाकरे गटात प्रवेश केलाय. दरम्यान,साकीनाकामध्ये काय घडलं पाहूया.

काय घडलं साकीनाकात ?

- एकनाथ शिंदेंची साकीनाका येथे सभा

- एकनाथ शिंदे 90 फुटी रस्त्यावरून जात होते

- याच रस्त्यावर मविआ उमेदवार नसीम खान यांचं कार्यालय

- संतोष कटके आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंना काळे झेंडे दाखवले

या घडलेल्या प्रकारानंतरर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाडीतून थेट खाली उतरले शिंदेंनी नजीकच्या मविआ कार्यालयात जात जाब विचारला, कार्यकर्त्यांना हेच शिकवता का असा सवाल केला. यामुळे प्रकारानंतर पोलिसांनी संतोष कटके यांना ताब्यात घेतले आणि दंड भरायला लावला. या प्रकरणानंतर कटके पिता पुत्रांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला..संतोष कटके याचे वडील साधू कटके हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर राज्यातील निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलंय..पुढील काही दिवसांत हा संघर्ष अधिक शिगेला पोहचणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT