BJP rebels Gopal Shetty saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : भाजपचा प्लान ठरला! नेत्यांनी उपसलेले बंडाचे हत्यार करणार म्यान

BJP Plan For Maharashtra Assembly Election : भाजपच्या अनेक नेत्यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाचे हत्यार उपसले आहे. पण ही बंडखोरी शांत करण्यासाठी भाजपने प्लान आखला आहे.

Nandkumar Joshi

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून जबरदस्त 'तडका' दिला आहे. सत्ताधारी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपलाही बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. पण नेत्यांनी उपसलेले बंडाचे हत्यार पुन्हा म्यान करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पेशल प्लान आखला आहे. बंडखोरीचा इशारा दिलेले किंवा थेट बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या नेत्यांची समजूत काढण्याची रणनीती आखलेली आहे. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली जाणार आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना साम टीव्हीचे मुंबईतील प्रतिनिधी गणेश कवडे यांनी सांगितले की, भाजपचे नेते पक्षातील बंडखोरी शमवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे, गोपाळ शेट्टी यांचे म्हणणे आहे की, बोरिवलीत वारंवार बाहेरचे उमेदवार का दिले जातात? बोरिवलीतील जनता याबाबत आम्हाला विचारणा करत आहे. त्यामुळेच अर्ज दाखल केला आहे. आता शेट्टींची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करत असून, त्यांच्यासोबत चर्चा करून भूमिका जाणून घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गोपाळ शेट्टींसोबत चर्चा करण्याची जबाबदारी विनोद तावडे यांच्याकडे देण्यात आल्याचे कळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा नेमका प्लान काय?

SCROLL FOR NEXT