Uddhav Thackeray :  
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे काही दिवस बाकी राहिलेत. या अखेरच्या दिवसात सभांचा धडाका सुरू आहे. आज उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे उमेदवार दादाजी भुसे यांच्यावर टीका केली.

Bharat Jadhav

जो गद्दार सांगतोय माझे माझी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध आहे ते मी तोडून टाकले आहे. यापुढे कोणताही गद्दार मालेगाव निवडून येणार नाही. तुमच्या मतदार संघाला लागलेला कलंक पुसून टाकायची संधी आहे्, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आमदार दादाजी भुसे यांच्यावर टीका केली. नाशिक येथे उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदार दादाजी भुसे यांच्यावर जोरदार टीका केली.

दादाजी भुसे हे पाचव्यांदा आमदारकीची निवडणूक लढवत आहेत, परंतु यावेळी मात्र ते शिंदे गट शिवसेनेकडून निवडणूक लढत आहेत. भुसे यांच्याविरोधात अद्वय हिरे यांनी दंड थोपटलेत. आज अद्वय हिरे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली. यावेळी त्यांनी नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि आमदार मंत्री दादाजी भुसे यांच्यावर टीका केली.

भुसेंवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी गेल्या वेळी आलो तेव्हा प्रचंड मोठी सभा, अद्वय हिरे यांचा प्रवेश झाला. बाळासाहेब ठाकरे यापूर्वी हिरे यांच्यासाठी आले होते. गेल्यावेळी मी गद्दार वर काही बोललो नव्हतो. तेव्हा गद्दाराने दाखवले की मी काही बोललो नाही. त्यावर भुसे म्हणतात की, जो गद्दार सांगतोय माझे माझी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध आहेत. म्हणून टीका केली नाही. पण संबंध मी तोडून टाकले आहे.

आज मात्र गद्दाराच्या भुसा पाडणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. तुमच्या मतदार संघाला लागलेला कलंक पुसून टाकायची संधी आहे.गद्दाराने किती पैसा वाटला कारण त्यांच्याकडे पैशाचा महापूर आहे त्या पैशाला तुमच्या आयुष्य विकू नका.

विकासाचे इकडे बरा वाजलेत. यांची मुलं ठेकेदार आहे स्वतःच्या मुलं बाळाची कल्याण केले. मागच्या वेळच्या सभेला आलो तेव्हा मुद्दामून अडथळा आणण्यासाठी रस्ते खोदून ठेवले होते. रस्ते खोदलेल्यांना मी धन्यवाद देतो. त्या रस्त्यावरील खड्ड्यात आता गद्दारांना वेगळा खड्डा खोदायची गरज नाही. आता त्याचा गद्दराला गडायचं आहे आणि माती टाकायची आहे.

तुम्ही कितीही अत्याचार केला तरी आम्ही झुकणार नाही, असे प्रशांत हिरे म्हणाले होते. अनेक खोटे केसेस आमच्या कार्यकर्त्यांवर केले जातात. आपले सरकार सत्तेत आल्यावर या सर्व तसेच मी काढून टाकीन. ज्याने खोट्या केसेस केल्या तो किती मोठा दाद असून दे त्याला तुरुंगात टाकल्याशिया राहणार नाही असं ठाकरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

Gold Price Today: सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात घसरण, १ तोळा सोनं १ लाख ५८ हजार रुपयांवर

रोहित पवारांच्या जीवाला धोका? पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी

Pune News: हा कसला मुळशी पॅटर्न! 'सिकंदर शेख'वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न, मुळशीत कुस्तीला गालबोट; पाहा VIDEO

शिवजयंतीला राज ठाकरेंना वाघनखांची भेट; आता याच वाघनखांनी सगळ्यांशी शेकहँड करतो|VIDEO

SCROLL FOR NEXT