Rahul Gandhi  Saam tv
Maharashtra Assembly Elections

Congress CEC Meeting: जागावाटपातील वाटाघाटीवर राहुल गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज; CEC बैठकीत सुनावलं

Assembly Election: राहुल गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज असून त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवलीय. काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी ओबीसी उमेदवारी आणि जागावाटपावरून नारजी व्यक्त केलीय.

Bharat Jadhav

जागावाटपावरून राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज आहेत. काँग्रेसच्या निवडणूक कमिटीच्या बैठकीत राहुल गांधींनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडी झालेल्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये राज्यातील नेत्यांनी वाटाघाटी व्यवस्थित केली नाही. तसेच राज्यात देण्यात आलेल्या ओबीसी उमेदवारांबाबतही राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादीसोबत झालेल्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये काँग्रेस नेत्यांना योग्य भूमिका मांडता आली नसल्याची मत राहुल गांधी यांनी आज झालेल्या काँग्रेस निवडणूक कमिटीच्या बैठकीत मांडलं. या बैठकीत त्यांनी नाराजी जाहीर केलीय. दरम्यान काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पहिल्या यादीत काँग्रेसने ४८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. परंतु काँग्रेसला मिळालेल्या आणि काँग्रेसने सोडलेल्या जागांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे नाराज आहेत.

मुंबई आणि विदर्भात, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला कमी जागा मिळाल्या आहेत. येथील काही जागा मित्रपक्षांना सोडल्याप्रकरणी राहुल गांधी नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी बोलतांना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजे होत्या. हे खरं आहे. राज्यातील विदर्भ, मराठावाडा, मुंबई,पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात मेरिटच्या आधारे काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजे होत्या.

आमचे सर्व मित्र पक्षासोबत चर्चा करताना हा घोळ झाला.पण तिघांची आघाडी असल्याने तो घोळ झाला. हे त्यांना आम्ही सांगितल्यावर त्यानंतर त्यांचं समाधान झाल्याचं नाना पटोले म्हणाले.

दरम्यान या बैठकीत राहुल गांधींनी राज्यातील नेत्यांना काही सुचना दिल्या आहेत. ओबीसीतील दुर्लक्षित जातींना उमेदवारांच्या यादीत स्थान द्या. ओबीसींच्या जागांवर विशेष लक्ष द्या. आपण जातीय जनगणना आणि ओबीसी मुद्यावर आक्रमक आहोत त्यामुळ त्यांना प्रतिनिधित्व मिळाल पाहिजे, अशा सुचना राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khekda Bhaji Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत खेकडा भजी, मुसळधार पावसात करा चटपटीत नाश्ता

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

नाशिक रिंगरोडची अलाईनमेंट बदलली? IAS अधिकाऱ्यांची होणार चौकशी, खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकारचा निर्णय

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

SCROLL FOR NEXT