Ajit Pawar  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Assembly Election: लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांकडून बारामतीतून लढणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र बारामती नाही तर अजित पवार कुठून लढण्याची चाचपणी करत होते? याबाबत दादांनीच खुलासा केलाय..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

अजितदादा नेमकं काय म्हणालेत? आणि दादा बारामती सोडणार असं का म्हणत होते? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या बारामती मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतण्या लढत होणार आहे. बारामतीत अजित पवारांचा विजयरथ रोखण्यासाठी पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.त्यापार्श्वभुमीवर अजित पवारांनी हवेली तालुक्यातील लोणी काळभोरमध्ये बोलताना आपण बारामतीत निवडणूक लढवणार नव्हतो, असा खळबळजनक गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय.

लोकसभेला बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्याने दादांनी बारामतीतून न लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अजित पवारांनी शिरुर-हवेली, सिन्नर, पुरंदर या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.. मात्र अजित पवार बारामती सोडून इतर मतदारसंघात चाचपणी करण्यामागची कारणं काय होती? पाहूयात

दादा बारामती का सोडणार होते?

लोकसभेला सुळेंना बारामतीतून 48 हजार मतांचं लीड

लोकसभेप्रमाणेच पुन्हा विधानसभेला पवार कुटुंबात सामना टाळण्याचा प्रयत्न

बारामतीत अडकून पडल्यास राज्यातील प्रचारावर मर्यादा येण्याची शक्यता

बारामतीतून लढण्यास इच्छूक नसल्याचं दादांनी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बारामतीत अजित पवारांच्या समर्थकांनी आंदोलन करत अजित दादांना आपली भूमिका बदलण्यास भाग पाडलं. मात्र लोकसभेला झालेला दगाफटका लक्षात घेता सावध झालेल्या अजित पवारांनी इतर मतदारसंघात चाचपमी केली होती. मात्र आता अजितदादा बारामतीकरांवर विश्वास ठेवल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे अजित पवारांच्या भावनिक आवाहन बारामतीकर स्वीकारणार की बारामतीत दादा बदलणार? याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT