Ajit Pawar 
Maharashtra Assembly Elections

Ajit Pawar: एकच ध्यास बारामतीचा सर्वांगीण विकास; अजित पवारांनी फोडला प्रचाराचा नारळ

Ajit Pawar: अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. अर्ज भरल्यानंतर त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केला.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

पुढील पाच वर्षांत आणखी काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणार. आता माझा पक्ष बारामतीला राज्यात नव्हे तर देशात एक नंबर करणार. जेजे नव ते बारामतीत हवं असे स्वप्न मी पाहिले एकच ध्यास बारामतीचा सर्वागीण विकास झाला पाहिजे, असं म्हणत अजित रवार यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला.

लोकसभेनंतर विधानसभेतही अख्या राज्याचं लक्ष बारामतीकडे लागलंय. बारामतीमध्ये चुरशीची लढत होणार असून येथे काका-पुतण्या अशी लढत होणार आहे. आज युगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी आपआपला उमेदवारी अर्ज भरला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना बारामतीत मोठं शक्तीप्रदर्शन केलं. अर्ज भरताच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी जनतेला संबोधित करताना अजित पवार भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. कण्हेरी गावतील ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

कन्हेरी मारुती रायला साक्षीने सांगतो मी प्रामाणिक काम केले. बारामती जनतेने टाकलेला विश्वासास तडा जावू न देता काम करतोय. दर वेळेप्रमाणे बारामतीकर माझ्या पदरात भरभरून मतांचे दान टाकतील. आज वसुबारस देशी गायीला राज्य मातेचा मान महायुतीने दिला आहे. पुढील पाच वर्षांत आणखी काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणार. आता माझा पक्ष बारामतीला राज्यात नव्हे तर देशात एक नंबर करणार, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

आज मनापासून बारामतीकरानी स्वागत केलं. सर्व उत्साहात होते हा उत्साह 20 तारखेपर्यंत टिकवा. प्रत्येकाच्या जीवनात विकासाचा नवा प्रकाश आणणार. सर्व घटकांना एकत्रित घेऊन काम केलं जातं . बारामतीबद्दल आज सर्वाँना आपली वाटली पाहिजे. मुलासारखे बारामतीला मी जपलं आहे. सात निवडणुकीत मला निवडून दिलं. बोजा टाकल्याने मी पहाटेच खडबडून उठतो आणी कामाला लागतो असंही ते म्हणाले. लवकरच धनगर आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवला जाणार असल्याची ग्वाहीही अजित पवार यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

Tukaram Mundhe : पान, गुटख्याची जाहिरात करता तर आधी तुमच्या मुलांना खायला द्या; तुकाराम मुंढे संतापले

SCROLL FOR NEXT